शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

सातपुड्यातील आदिवासींची घरे भर उन्हातही थंडगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 20:16 IST

जळगाव जामोद- मानवाने विकसीत केलेल्या भौतिक सुविधांनाही लाजवतील अशा सुविधा आदीवासी निर्माण करतात तेव्हा आपसुकच आपल्याला आदिवासींचे महत्व कळते.

जयदेव वानखडे - जळगाव जामोदजगात तंत्रज्ञान खुप पुढे गेले विज्ञान एवढी प्रगती केली की नवनवीन शोधांमुळे भौतिक सुविधांचा मानवी जीवनात सुकाळ आला. घरोघरी सोयी सुविधांनी जागा व्यापली. मात्र यातुन सुटला तो आदिवासी वर्ग सातपुड्याच्या जंगलात राहून आपले संघर्षमय जीवन जगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी राबतो. अशा जीवनात सुविधांचा विचार कोण करणार? दोन वेळचे जेवण मिळाले तरी खुप काही कमविल्याचा आनंद त्यांचा चेहरा सांगुन जातो आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून मानवाने विकसीत केलेल्या भौतिक सुविधांनाही लाजवतील अशा सुविधा हे आदीवासी निर्माण करतात तेव्हा आपसुकच आपल्याला आदिवासींचे महत्व कळते.जळगाव जामोद तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगांमध्ये जवळपास १७ आदिवासी गावे वसली आहेत. डोंगराळ भागात आजही एसटी जात नाही. तेथे रस्ते नाहीत, वीज नाही याची तमा न बाळगता हे आदिवासी आपल्या परंपरा जपत जगतात त्यांची घरे अतिशय जुन्या आणि सुविधा नसलेली आहेत. परंतु नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी हे लोक नेहमी तत्पर असतात. भर उन्हाळ्याचे दिवसात उन्हापासून आपल्या मुलांबाळांचा बचाव करण्यासाठी त्यांनी शक्कल लढवून तयार केलेले घर म्हणजे भौतिक सुविधा असलेल्या घरांनाही लाजवेल इतके वातानुकुलीत असते. त्यांच्या घरावर मातीची छपरे आपल्याला आढळून येतात. या मातीच्या छपरामुळे कुळांना माती आणि शेणाच्या लेप देवून स्वच्छ सारवण केल्या जाते चारही बाजुंनी शेणामातीचे कुळ वरून मातीचे छप्पर असलेल्या या घरांना लाकडी बांबुच्या फळ्यांपासून बनविलेला दरवाजा लावण्यात येतो. त्यामुळे घरात येणारी हवा थंड वाहते आणि घरामध्ये ना पंखा ना कुलर तरीही घरे या आदिवासींना एसीचा आनंद घेतात.अशी बनवितात आदिवासी घरावरील छप्परेडोंगरकपारीत गवती छप्पर तर कुठ टिनपत्र्यांची आदिवासींची घरे मात्र उन्हाळ्याची दाहकता त्यांना सोसवत नाही अशावेळी घरावरील छतावर ताडपत्री अंथरली जाते. या ताडपत्रीवर सुकलेल्या गवताचा पातळ थर दिला जातो. आणि त्यावर डोंगराळ मुरुमाची मऊ माती अंथरतात ही झाली छताची मरम्मत तर आजुबाजुला शेणाने लिपलेले कुळ आणि व्हेंटीलेटर म्हणून दरवाजाला बांबुच्या कामठांचे झडप. यामुळे घरात कसे थंडगार वाटते. नैसर्गिकरित्या वातानुकुलीत झालेले हे घर खरोखरच आरोग्यदायी वाटते. नैसर्गिकरित्या वातानुकुलीत झालेले हे घर खरोखरच आरोग्यदायी वाटते आणि आदिवासींचे उन्हापासून संरक्षणही करते. अशाप्रकारे वातानुकुलीत घराचा प्रयोग गेल्या १० वर्षापासून वडपाणी, सोनबर्डी, नांगरटी, कहूपट्टा, भिंगारा, गोमाल, निमखेडी, हनवतखेड, रायपुर, चाळीसटापरी इत्यादी परिसरातील आदिवासी गावांमध्ये केला जातो.सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरात वनराई कमी झाल्याने उष्णतामान चांगलेच जाणवते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आदिवासींनी वातानुकुलीत घरांची लढवलेली शक्कल खरोखर उल्लेखनीय आणि कौतुक करण्यासारखी आहे. भौतिक सुविधांमुळे तुम्हाला आजार जडतात मात्र ही घरे खरोखर आरोग्यदायी असुन नैसर्गिक उपचार केंद्राचे काम करणारी आहेत आणि पावसाळ्यात या उताराच्या छपरावरून पाणी घसरून जाते आणि हळुहळू ह्याच छपरांवर हिरवेगार गवतही उगवते त्यामुळे श्रावणात अतिशय सुंदर हिरवीगार घरे पाहायला मिळतात. मात्र त्यातून पाणी गळत नाही, हे विशेष !घराच्यासह इतर बाबतीतही या लोकांचे वेगळेपण पाहायला मिळते. उंचावर मचाण बांधुन त्यावर पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवली जातात. त्यामुळे खेळती हवा आणि मातीची भांडी यामध्ये थंडगार पाणी मिळते. आणि पाणी उंचावर ठेवल्याने रात्री बेरात्री वन्यप्राणी सुध्दा फिरकत नाहीत असे निकोप जीवन येथील आदिवासी कुठली सुविधा नसतानाही जगतात.