खामगाव : घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरातून ३२ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना शहरानजीकच्या वाडी येथे २५ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहरानजीकच्या वाडी येथील वृंदावन नगरातील रहिवासी विशाल घनश्याम चांडक हे २१ एप्रिलपासून बाहेरगावी गेले होते. दरम्यान घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी विशाल चांडक यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातील रोख व सोन्या -चांदीचे दागिने लंपास केले. २५ एप्रिल रोजी शेजाऱ्यांना दरवाज्याचा कडीकोंडा तुटलेला दिसून आल्याने त्यांनी याबाबत विशाल चांडक यांना माहिती दिल्याने ते घरी आल्यानंतर चोरट्यांनी रोख २५ हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा ३२ हजाराचा ऐवज लंपास केल्याचे त्यांना दिसून आले. याप्रकरणी विशाल चांडक यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५७, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
घर फोडून ऐवज लंपास
By admin | Updated: April 26, 2017 00:58 IST