शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

विदर्भातील केवळ चार जिल्ह्यात फलोत्पादन कार्यक्रम!

By admin | Updated: December 25, 2016 02:22 IST

राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. २४- रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात राबविण्यात येणारा फलोत्पादन कार्यक्रम विदर्भातील अकोला, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या चार जिल्ह्यात पोहचला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये निधी फळलागवडसाठी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये विदर्भातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. पारंपारिक पिकांना फाटा देवून शेतीत आधुनिकीरण आणण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्याची गरज असते. फळलागवडसारख्या पिकांमुळे शेतकर्‍यांचा विकास साधला जावू शकतो. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फळलागड कार्यक्रम राबविण्यात येतो. फलोत्पादनासाठी रोहयोकडून शेतकर्‍यांना निधीही देण्यात येतो; यामध्ये राज्यातील जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये फळलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांचा रोहयोच्या फलोत्पादन कार्यक्रमात समावेश असून इतर जिल्हे या फलोत्पादनापासून दूर आहेत. राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, परभणी, अकोला, पालघर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. सन २0१५-१६ व २0१६-१७ या दोन वर्षासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांकरिता एकूण ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी २७ लाख ७६ हजार रुपये, रत्नागिरी ३१ लाख ३५ हजार, नाशिक १ कोटी ६४ लाख १३ हजार, धुळे २९ लाख ९0 हजार, परभणी ३८ लाख ९३ हजार, अकोला जिल्ह्याकरिता ६६ लाख ७0 हजार, पालघर, ५१ लाख ४६ हजार, सोलापूर १ कोटी ५ लाख ७५ हजार, कोल्हापूर १३ लाख ५१ हजार, जळगाव २३ लाख ७८ हजार, अहमदनगर १ कोटी ६१ लाख २ हजार, बीड ६४ लाख ५२ हजार, नांदेड ३७ लाख ६ हजार, लातूर २५ लाख, यवतमाळ ५५ लाख १४ हजार, बुलडाणा २0 लाख २७ हजार व अमरावती जिल्ह्याकरिता ६८ लाख ५४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. रोहयोमुळे फळलागवडीला संजीवनीफळलागडीसाठी लागणारा खर्च शेतकरी भरू शकत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सिंचनाची व्यवस्था असतांनाही फळगावडीकडे पाठ फिरवली होती; मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फलोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने फळलागवडीला संजिवनी मिळाली आहे. फळलागवडीसाठी रोहयोकडून निधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याने अनेक सर्वसामान्य शेतकरी या योजनेतून फळलगावडीकडे वळले आहेत.