शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश हॉर्न, सायलन्सरचे कोणालाच कसे काही वाटत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:22 IST

घाबरविणारे हॉर्न लावणाऱ्यांवर नियंत्रण बुलडाणा शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत सातत्याने कारवाया करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ...

घाबरविणारे हॉर्न लावणाऱ्यांवर नियंत्रण

बुलडाणा शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत सातत्याने कारवाया करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. घाबरविणाऱ्या हॉर्नवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे. तरीसुद्धा असे हॉर्न लावणारे काही वाहनचालक मोकाट आहेत. काही बुलेटचालक सायलन्सरचा कर्णकर्कश आवाज करत शहरात मोकाट फिरत आहेत. त्यांचाही बंदोबस्त करणे आवशयक ठरत आहे. हे वाहनचालक शाळा किंवा दवाखान्यांसमोरून जातानाही भान राखत नसल्याने कठोर कारवाई करणे आवश्यक झाले आहे.

कर्णकर्कश हॉर्न लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात फटाक्यांसारखा आवाज करत धावणाऱ्या बुलेट सध्या कमी झालेल्या आहेत. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नवरही बहुतांश नियंत्रण मिळविण्यात आले आहे. वाहनचालकांनी इतरांना त्रास होईल, असे वर्तन कदापि करू नये अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

एन. एम. परदेसी, वाहतूक पोलीस अधिकारी, बुलडाणा.

महिनाभरात ८० जणांवर पोलिसांकडून कारवाई

वाहनांना कर्णकर्कश हॉर्न बसवून ते गावभर वाजवत फिरणाऱ्या ८० पेक्षा अधिक वाहनचालकांवर पोलिसांकडून

कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ठरावीक दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कायमचा बंद करण्याबाबत समजदेखील देण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस अधिकारी एन. एम. परदेसी यांनी दिली आहे.

काय कारवाई होऊ शकते?

वाहनांच्या मूळ रचनेत प्रशासनाच्या परवानगीशिवाय बदल करणे ही बाब चुकीची आहे. असे असताना अनेकजण त्यात मनमानी बदल करतात. त्यात कर्णकर्कश हॉर्नचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. अशा वाहनचालकांवर

दंडात्मक कारवाई केली जात आहे.