शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांची कामे करण्यास आशा स्वयंसेविकांचा नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:22 IST

बुलडाणा:  अंगणवाडीसेविकांनी संप पुकारल्यामुळे अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक  गावात एकात्मिक बालविकास समिती नेमून आशा स्वयंसेविकांना पोषण आहार शिजविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आशा स्वयंसेविकांनी पोषण आहार शिजविण्यास नकार दिला आहे. 

ठळक मुद्देअंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित बालविकास समिती नेमून पोषण आहार शिजविण्याचे आदेश 

जिल्हा परिषदसमोर मोर्चा बुलडाणा:  अंगणवाडीसेविकांनी संप पुकारल्यामुळे अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक  गावात एकात्मिक बालविकास समिती नेमून आशा स्वयंसेविकांना पोषण आहार शिजविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आशा स्वयंसेविकांनी पोषण आहार शिजविण्यास नकार दिला आहे. जिल्हाभरातील ग्रामीण व शहरी भागात जनतेच्या आरोग्य संवर्धनाचे काम करणाºया आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ३ आॅक्टोबर रोजी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडीसेविकांनी संप पुकाल्यामुळे शासनाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाला प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांकडून अंगणवाडीत पोषण आहार शिजवून मुलांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याला विरोध होत आहे.  सीटू प्रणित आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातून आलेल्या शेकडो आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, शहरी व ग्रामीण जनतेचे आरोग्य संवर्धन करण्याचे काम आशा वर्कर्स व गटप्रवर्तक करीत असतात. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिल्या जात नाही. तसेच त्यांना केसेसनिहाय दिला जाणार अत्यल्प मोबदलादेखील पाच-पाच, सहा-सहा महिने मिळत नाही. त्यामुळे आशा वर्कर्सना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागते. आशा वर्कर्सना १० हजार व गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, आशा वर्कर्सना वजनकाटे, झोळी, तापमापी खरेदी त्यांच्याच पैशाने खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. हा आशा वर्कर्सवर मोठा अन्याय आहे. जिल्ह्यातील अनेक गटप्रवर्तकांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत, ते आदेश त्वरित देण्यात यावेत. एप्रिलपासून थकीत असलेला आशा वर्कर्सचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, तसेच गटप्रवर्तकांचे थकीत मान तात्काळ अदा करण्या यावे. गटप्रवर्तकांनी गावांना भेटी दिल्याबाबत त्या गावातील नागरिकाची सही घेण्याचा आदेश रद्द करण्यात यावा. नगरपालिके अंतर्गत काम करणा-या शहरी आशा वर्कर्सना गणवेश व ओळखपत्र द्यावेत. यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात वर्षा शेळके, विजया ठाकरे, ज्योती ठेंग, ललीता बोदडे, मंदा म्हसाळ, अरुणा रत्नपारखी, मंगला गव्हले, ऊर्मिला माठे, गोदावरी खंडेराव, इंदिरा इंगळे, सुरेखा ढगे, चंदा झोपे, नलीनी गोरे, प्रमोदिनी वळसे, अनिता कदम, संतोषी नागरे, प्रतिभा बाणाईत, नीता कायंदे यांच्यासह मोठ्या संख्येने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.