शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

एक लाख कुटुंबाच्या घेणार गृहभेटी!

By admin | Updated: August 11, 2016 01:40 IST

स्वच्छता अभियानातंर्गत शौचालय बांधण्याबाबत जागृती होणार.

बुलडाणा, दि १0 : स्वच्छता भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २0१६ दरम्यान ह्यस्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटीह्ण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून जिल्ह्यातील ३३३ ग्रामपंचायतीमधील एक लाख कुटुंबाच्या गृहभेटी घेतल्या जाणार आहेत. यातून शौचालय बांधणे व वापरण्याबाबत जागृती करण्यात येणार आहे.स्वच्छ भारत मिशन व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ होत आहे. जिल्ह्यातील स्वच्छता अभियानात २0१६-१७ मध्ये निवडण्यात आलेल्या ३३३ ग्रामपंचायतीत तसेच या वर्षात हगणदरीमुक्त होणार्‍या ग्रामपंचायतीत हे अभियान राबविण्यात येईल. या अभियानातून शौचालय नसणार्‍या कुटुंबांना ते बांधून वापरसाठी तर शौचालय असणार्‍या कुटुंबांना ते वापरासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने जवळपास एक लाख कुटुंबांना गृहभेटी देण्यात येणार आहेत.या अभियान कालावधीत ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, ग्रामविकास, कृषी, नरेगा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या समन्वयातून स्वच्छतेसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न होणार आहेत. यात लोकप्रतिनिधी, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योजक यांचा सहभाग घेतला जाणार आहे. शिवाय यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने प्रशासकीय यंत्रणा सक्रिय राहणार आहे.