शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थींंना घरपोच धनादेशाचे वाटप

By admin | Updated: July 2, 2016 00:56 IST

‘आपल गाव आपला विकास’ उपक्रमाला लोणार तालुक्यात प्रतिसाद.

लोणार (जि. बुलडाणा) : 'आपले गाव आपला विकास; सुट्टीच्या दिवशीही कामकाज' या अभिनव उप्रकमानंतर सामाजिक बांधीलकी या नवीन अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाला १ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांच्या हस्ते लाभार्थींंना घरपोच धनादेशाद्वारे लाभ देऊन सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोर्मयादा असणार्‍या दारिद्रय़रेषेखालील लाभार्थींंना लाभ देण्यात येतो. शासनाने ही योजना १८ ऑक्टोबर २0१२ पासून सुरू केलेली असून, दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा स्त्री मृत्यू पावल्यास त्यांच्यासाठी या योजनेंतर्गत २0 हजार रुपये एवढी मदत दिली जाते. जनतेमध्ये शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा प्रसार व्हावा, योजनांचा लाभ तत्काळ मिळावा, या उद्देशाने शासन विविध माध्यमातून योजनांची जाहिरात करते. तसेच या योजना स्थानिक पातळीवर महसुली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. मात्र शासनाच्या योजना जनजागृतीअभावी रखडल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. याची जाणीव होऊन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी संबंधित कुटुंबास १५ दिवसांच्या आत सामाजिक बांधीलकी या उपक्रमांतर्गत घरपोच लाभ देण्यात येईल. म्हणजे लाभार्थीस कोणतेही कष्ट वा खर्च येणार नाही. यासाठी लाभार्थीस घटना घडल्यानंतर संबंधित गावच्या तलाठी किंवा तहसीलदार यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.