शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुलीच्या नोटिसची केली होळी

By admin | Updated: February 7, 2017 02:57 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सहायक निबंधक कार्यालयासमोर आंदोलन

खामगाव, दि. ६- ग्रामसेवा सहकारी संस्थेमार्फत घेतलेल्या कर्ज वसुलीसाठी बजावण्यात आलेल्या नोटिसची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर होळी केली. शेतकर्‍यांकडे ग्रामसेवा सहकारी संस्थेमार्फत घेतलेले कर्ज थकीत असून, या कर्ज वसुलीसाठी शेतकर्‍यांना नोटिस बजावण्यात येत आहेत. दरम्यान, सदर कर्ज वसुलीसाठी ग्रामसेवा संस्थेकडून सहायक निबंधक कार्यालयाकडे सर्टिफिकेट देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. या सर्टिफिकेट मागणीच्या अनुषंगाने सहायक निबंधक कार्यालयाने शेतकर्‍यांना महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम १९६0 च्या कलम १0१ नुसार सर्टिफिकेट का देण्यात येऊ नये, यासाठी म्हणणे मांडण्यासाठी शेतकर्‍यांना नोटिस पाठविल्या आहेत. या नोटिसमधून शेती हर्रासीच्या सूचना देण्यात येत आहेत. यावर्षी ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्यावेळी पावसाने दिलेला खो यामुळे शेती उत्पादनात घट आली आहे, तर सोयाबीनसोबतच इतर पिकांना भाववाढसुद्धा नाही. त्यातच जिल्हा बँक पीक कर्ज वसुलीसाठी नोटिस बजाविण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी सोमवारी येथील सहायक निबंधक कार्यालय गाठून रोष व्यक्त केला. तसेच मिळालेल्या नोटिसची होळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनप्रसंगी शेतकर्‍यांची उपस्थिती होती.