शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेडवासियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST

बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्‍यातील हिवरखेड पूर्णा व तढेगाव या दोन्ही रेतीघाटांना सील करण्यात यावे व संबंधित कंत्राटदारांवर तत्काळ ...

बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्‍यातील हिवरखेड पूर्णा व तढेगाव या दोन्ही रेतीघाटांना सील करण्यात यावे व संबंधित कंत्राटदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी हिवरखेडवासियांनी १५ मार्चपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

सिंदखेड राजा तालुक्‍यातील हिवरखेड पूर्णा व तढेगाव येथील रेतीघाटांचा लिलाव एक महिन्यापूर्वी झाला असून, दोन्ही रेती घाटांच्या कंत्राटदारांकडून मनमानी कारभार सुरु आहे. त्यांच्याकडून शासनाच्या परिपत्रकाचे तसेच नियम व अटींचे कुठलेही पालन होत नसून, नदीपात्रात अवजड वाहने जसे टिप्पर व इतर वाहने पोकलेन व जे. सी. बी. यांचे माध्यमातून नदीपात्रातील रेतीचे उत्खनन करुन सपाटीकरणही याच दोन्ही पोकलेन व जे. सी. बी. मशीनच्या माध्यमातून होत आहे. लिलाव प्रक्रिया झाल्यापासून दोन्ही रेती घाटांमधून दहापट वाळूचे अवैधरित्या उत्खनन करुन वाहतूक झालेली आहे. मात्र, कंत्राटदारांच्या पावत्यांनुसार १,००० ते १,१०० ब्रॉस रेतीचे उत्खनन झाल्याचे दाखविले जात आहे. हा सर्व प्रकार सिंदखेड राजा तहसीलदार सुनील सावंत तसेच स्थानिक तलाठी व मंडल अधिकारी यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची लूट दिवसाढवळ्या केली जात आहे. नदीपात्राचा लिलाव केल्यानंतर ताब्यात देतेवेळीच्या व्हिडीओ क्लीप (दोन्ही घाटांची) देण्यात यावी तसेच सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासून नदीपात्राचे मोजमाप करुन त्याचा अहवाल देण्यात यावा, तढेगाव, हिवरखेड पूर्णा येथील रेतीघाटांच्या कंत्राटदारांवर अवैधरित्या रेती उत्खनन केल्याप्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करुन हे रेतीघाट सील करण्यात यावेत. त्याचबरोबर संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी दोन्ही रेतीघाटांच्या कंत्राटदारांना पाठीशी घातल्याप्रकरणी त्यांच्यावरही तत्काळ गुन्हे दाखल करुन निलंबनाची कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी हिवरखेड पूर्णा येथील ग्रामस्थांनी १५ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिवरखेड पूर्णा येथील संतोष दराडे, सर्जेराव गायकवाड, कुंडलिक काकडे, प्रकाश गोरे व ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.