शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात उद्यापासून ऐतिहासिक शांती महोत्सव; देशभरातील लक्षावधी भाविकांची लाभणार उपस्थिती

By अनिल गवई | Updated: October 8, 2022 12:14 IST

खामगाव येथील शांती महोत्सवाला तब्बल ११४ वर्षांची अखंडीत परंपरा आहे. सन १९०८ साली खामगावात या उत्सवाला सुरूवात झाली.

अनिल गवईखामगाव: तब्बल ११४ वर्षांची परंपरा असलेल्या शांती उत्सवास रविवारपासून खामगावात प्रारंभ होत आहे. पुढील ११ दिवस भक्तीमय वातावरणात हा उत्सव पार पडणार असून, देशात केवळ खामगावातच हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे जगदंबा (मोठी) देवीच्या दर्शनासाठी शांती उत्सवाच्या  पहिल्या दिवसांपासूनच भाविकांची रिघ लागते. हे येथे उल्लेखनिय!

खामगाव येथील शांती महोत्सवाला तब्बल ११४ वर्षांची अखंडीत परंपरा आहे. सन १९०८ साली खामगावात या उत्सवाला सुरूवात झाली. तेव्हापासून  देवीच्या ठाण्यांचा (जागा) बदलाचा अपवाद वगळता, शांती महोत्सवात कधीही खंड पडलेला नाही. अगदी कोरोना काळातही खामगावात साधेपणाने शांती महोत्सव साजरा झाला. यावर्षी निर्बंधमुक्त शांती उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे खामगावात चैतन्याचे वातावरण असून शहरात ठिकठिकाणी शांती महोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली आहे. शांती उत्सव देशात केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे. त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते.  दरम्यान, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वषार्पासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे.

आंध्रप्रदेशात देवीचे मुळ ठाणे!आंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन  येथे जगदंबा देवीचे मुळ ठाणे आहे.  कै.कैरन्ना आनंदे (रा.लोहगाव ) देवीचे नि:स्सिम भक्त होते. खामगावात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी खामगावात शांती महोत्सवाला सुरूवात केली. तेव्हापासून खामगावात शांती महोत्सवाची प्रथा सुरू आहे.

देवीला शांत करण्यासाठी ११ दिवस आराधना!विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे  म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते.

२४ तास दर्शन सुविधाउत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी भक्तांकरीता २४ तास आईचा दरबार खुला असतो. गर्दी नियंत्रणासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. उत्सव काळात दहा दिवस भाविकांनी दान केलेल्या साड्या, पातळे, चोळ्या यांचे मंडळाकडून गरजुंना वाटप केल्या जाते.