शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समाज आणि शासनाकडून ‘हिंदी’ दुर्लक्षित!

By admin | Updated: September 14, 2014 00:37 IST

लोकमत परिचर्चा : शहरातील हिंदी शिक्षक, प्राध्यापकांच्या चर्चेतील सुर

अनिल गवई / खामगावखामगाव: समजण्यास सोपी असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना हिंदी या भाषेविषयी गोडी आहे. मात्र, पालकांच्या इंग्रजी भाषेच्या अट्टाहासापायी अनेक विद्यार्थी हिंदीसह मातृभाषेपासून दुरावत चालले आहेत. समाज आणि शासनाकडून हिंदीला सापत्न वागणूक मिळत असल्याच्या रोकठोक भावना शहरातील विविध नामांकीत शिक्षण संस्थांमधील शिक्षकवृदांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.जागतिक हिंदी दिवसांनिमित्त शनिवारी शहरातील विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना बोलते केले असता, त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. इंग्रजी भाषेच्या वाढत्या आकर्षणामुळे मातृभाषा दुर्लक्षित होत आहेत. राज्यातील हिंदी माध्यमांच्या शिक्षण संस्था वगळता अन्य शिक्षण संस्थामध्ये हिंदी भाषेची अतिशय दयनिय अवस्था आहे. इंग्रजी भाषेसह मराठी शिक्षण संस्थामध्ये हिंदीला अतिशय दुय्यम स्थान दिल्या जात असल्याचेही शिक्षकवृंदांनी स्पष्ट केले. काहींनी हिंदी भाषेचा स्तर उंचावण्यासाठी ही भाषा सक्तीची करण्याचा उपाय सुचविला. एखाद्या भाषेला मोठे करण्यासाठी केवळ तिला कागदोपत्री दर्जा देवून थांबता येणार नाही. हिंदीला राजाश्रय मिळावा. स्वातंत्र्याची चळवळ हिंदीतूनच उभी राहीली. मात्र, नं तर काही स्वार्थी राजकीय पुढार्‍यांनी या भाषेचा विरोध केला. तथापि, हिंदी भाषेचे महत्व टिकविण्यासाठी उच्च शिक्षणाचे माध्यम केवळ हिंदी हीच भाषा असावी, असेही मत यावेळी एका शिक्षकाने व्यक्त केले. उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे हिंदी भाषेतून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली असल्याची खंत अनेक शिक्षकांनी शेवटी व्यक्त केली.