शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत

By admin | Updated: February 27, 2016 01:55 IST

२0१३ मधील नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा.

नीलेश शहाकार / बुलडाणा राज्यात २0१३ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान अतवृष्टी व पूर यामुळे शे तकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या दरम्यान राज्यातील आठ जिल्ह्यांत शेती व फळपिकांचे ५0 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली. या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदतनिधी देण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने २५ फेब्रुवारी रोजी घेतला असून, यातून २१ कोटी ४२ लाख ३७ हजारांचा निधी वितरित केला जाणार आहे. यात बुलडाणा जिल्ह्याला ८४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.२0१३ च्या ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जिल्ह्याला गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले. बर्‍याच ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून निघाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा ही रब्बी पिके, संत्रा, लिंबू, केळी या फळपिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे या आठ जिल्ह्यांतील जवळपास १ लाख ८२ हजार ९४३ शेतकरी प्रभावित झाले होते.या नुकसानाबाबत शासनामार्फत सर्व्हे करण्यात आला होता. तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. आता शेतकर्‍यांना दिलासा देत, बाधित शे तकर्‍यांना अर्थसहाय्य देण्यासाठी २१ कोटी ४२ लाख ३७ हजारांचा निधी राज्य शासनाकडून देण्यास मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात नुकसान अहवालाची फेरतपासणी करून १0 मार्चपर्यंत शासनाकडे सादर करायची असून, यानंतर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी ८४ लाखांची मदतबुलडाणा जिल्ह्यात २0१३ मध्ये ६ हजार शेतकर्‍यांना पावसाचा मोठा फटका बसला. बर्‍याच ठिकाणी उभी पिके झोपली तर काही ठिकाणी पुरामुळे संपूर्ण शेती खरवडून निघाली होती. चिखली, शेगाव, सिंदखेड राजा, बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात १६८ गावे बाधित झाली, तर २९ हजार ७२३ हेक्टर पीक जमिनीचे नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. ही बाब लक्षात घेता, २५ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्याला ८४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.