शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनापेक्षा उपसा सिंचन व पुलावर जास्त खर्च

By admin | Updated: May 6, 2016 02:22 IST

जलसंपदा मंत्र्यांनी जिगाव प्रकल्पाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सुहास वाघमारे /नांदुरा (जि. बुलडाणा)आधी पुनर्वसन मग धरण असे शासनाचे धोरण सिंचन प्रकल्पाच्या कामाबाबत राबविले जाते. मात्र जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पासाठी आतापर्यंत झालेल्या १५00 कोटी रुपयांच्या खर्चामध्ये अध्र्यापेक्षा जास्त खर्च हा उपसा सिंचन योजना व धरणाच्या पाण्यामुळे बाधित होणार्‍या पाच पुलांच्या कामावर केल्याने एकाही गावाचे पुनर्वसन मागील दशकात झाले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांना वारंवार त्यांच्या न्यायपूर्ण मागण्यांसाठी प्रकल्पस्थळी आंदोलन करून धरणाचे काम बंद पाडावे लागते. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पुनर्वसनाला गती देण्याची व सिंचन योजना व पुलांवर गरज नसताना झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे.४00 कोटी रुपयांची पहिली प्रशासकीय मान्यता असलेल्या जिगाव प्रकल्प आजरोजी सहा हजार कोटी रुपयांचा झाला आहे. मागील तीन दशकापासून कागदावरच असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला सात वर्षांपूर्वी प्रत्यक्षात सुरुवात झाली. मातीभिंतीच्या कामाला प्रारंभ होताच प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, मागील दशकात पहिल्या टप्प्यातील एकाही गावाचे पुनर्वसन झाले नाही व धरणाच्या मातीभिंतीचे कामही अर्धेच झाले आहे व पायाचे बांधकाम यावर्षी सुरू झाले. त्या तुलनेत मात्र धरणात पाण्याच्या साठवणुकीबाबत नियोजन ढासळले असताना धरणातील पाण्याचा उपसा करण्यासाठी कंत्राट देण्यात आलेल्या १२ उपसा सिंचन योजनांच्या कामांवर ६00 कोटी रुपये व धरणाच्या पाण्याने बाधित होणार्‍या पाच पुलांच्या कामांवर ३00 कोटी रुपये पाटबंधारे विभागाने खर्च केले आहेत.