शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

नागझरी येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर श्रावण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:02 IST

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात नागझरी आणि केशव शिवणी या दोन ठिकाणी पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असून ती एका खो-यात बांधण्यात आली आहेत. दर श्रावण सोमवारला आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनाकरीता अलोट गर्दी असते. 

ठळक मुद्देदर श्रावण सोमवारला आणि महाशिवरात्रीला दर्शनाकरीता भाविकांची अलोट गर्दीमंदिर पुरातन असून संपूर्ण दगडी खांबावर उभे; भुयार पद्धतीचे बांधकाम  मंदिराच्या पश्चिमेला गो-मुख असून, त्याून बाराही महिने पाण्याची धार अखंड वाहते

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात नागझरी आणि केशव शिवणी या दोन ठिकाणी पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असून ती एका खो-यात बांधण्यात आली आहेत. दर श्रावण सोमवारला आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनाकरीता अलोट गर्दी असते. नागझरी येथील सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. नागझरी हे गाव शेंदुर्जन गावापासून तीन किमी अंतरावर असून, नागझरी गाव शिवारात एका खोºयात निसर्गाच्या सानिध्यात सिद्धेश्वराचे भव्य मंदिर आहे. या मंदिराची स्थापना कोणत्या काळात झाली आणि कोणी केली याची नोंद कोठेही नाही. हे मंदिर पुरातन असून संपूर्ण दगडी खांबावर उभे आहे. भुयार पद्धतीचे बांधकाम असून, महादेवाची पिंड आतील गाभाºयात स्थापित आहे.सिद्धेश्वराला बेलाची लाखोळी वाहण्यासाठी आणि आपली इच्छापुर्ती करण्यासाठी भाविक भक्त महाप्रसादाचे आयोजन येथे करतात. परिसरात मोठमोठी वडाची वृक्ष असून, पिंपळ, बेल, लिंब या नानाविविध वृक्षांनी हा परिसर नटलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात कित्येक भाविक मनशांतीकरीता जप करण्यासाठी एकांत बसतात. मंदिराचे मुख पुर्वेला असून अगदी समोर पश्चिमेला गो-मुख आहे. या गो-मुखातून सतत १२ ही महिने पाण्याची धार अखंडपणे सुरु असते. भाविक या धारेखाली आंघोळ करुन मन शुद्ध करतात. या हेमाडपंथीय मंदिरात पुजारी म्हणून सुभाष वाघ काम पाहतात. या संस्थानचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून माळूबाबा यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर घागरे महाराज, दत्तु महाराज, डिघोळे महाराज यांनी सुद्धा १९ व्या शतकात येथे मंदिराची सेवा केली. मंदिराचा परिसर विकसीत व्हावा, म्हणून माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तिर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा दिला. तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत १० लाखाचे भक्त निवास येथे उभारण्यात आले. शेंदुर्जन वारकरी सांप्रदाय यांच्यावतीने दरवर्षी भव्य भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रस्ता ही महत्वाची बाब असून, स्थानिक आमदार, जि.प.सदस्य आणि पंचक्रोशितील भाविकांनी पुढाकार घेणे महत्वाचे आहे.