शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकीला उसळली प्रचंड गर्दी

By admin | Updated: September 12, 2016 01:48 IST

बुलडाणा जिल्ह्यात तयारीला वेग; मराठा क्रांती मोर्चा ठरणार रेकॉर्ड ब्रेक.

बुलडाणा, दि. ११ : कोपर्डी घटनेचा निषेध तसेच मराठा समाजहिताच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांच्यावतीने २६ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची तयारी जिल्हाभर मोठय़ा उत्साहाने केली जात आहे. प्रत्येक तालुका व मोठय़ा शहरांच्या ठिकाणी होणार्‍या नियोजन बैठकांना समाजबांधवांची स्वयंस्फूर्तीने होणारी गर्दी या मोर्चाच्या यशस्वितेचे संकेत देणारी ठरत आहे. ११ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या सूक्ष्म नियोजनासाठी जिल्हा स्तरावर पार पडलेली बैठकदेखील लक्षवेधी ठरली. रविवारी शरद कला महाविद्यालयात ही बैठक पार पडली. जिल्ह्यातील मराठा समाजाचे सर्वच पक्षातील आजी, माजी लोकप्रतिनिधी, नेते तसेच सर्वच क्षेत्रातील मातब्बर मंडळी व समाजबांधव या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थतेच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या उपाययोजना, मोर्चाचा मार्ग, तालुका स्तरावर करावयाचे नियोजन, वाहतूक यासह इतर बाबतीत यावेळी चर्चा करण्यात आली. मूक मोर्चा असल्याने कोणतीही नारेबाजी न करता केवळ हाती निषेधाचे काळे झेंडे आणि काही घोषवाक्य लिहिलेले फलक घेत या मोर्चात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजातील शैक्षणिक संस्थाचालकांनी मोर्चाच्या दिवशी आपल्या शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याचा निर्णय यावेळी व्यक्त केला. या बैठकीत जिल्हाभरातील समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पक्ष, राजकारण, संघटना बाजूला ठेवून केवळ समाजहिताच्या मागण्यांसाठी या मोर्चात सर्वांंनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. महिला आणि युवतींनी मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करीत, हा मोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कोणत्याही पक्षाच्या, जातीच्या किंवा शासनाच्याही विरोधात हा मोर्चा नाही. त्यामुळे सर्वच पक्षातील मराठा समाजबांधव या मोर्चाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोर्चाच्या नियोजनासाठी बैठका पार पडत असून, या बैठकांना समाजबांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.