शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस, जनजीवन विस्कळीत; अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:59 IST

शुक्रवारी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तब्बल दोन तास जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली तर जनजीवन विस्कळीत झाले.

बुलडाणा, दि. 15 - शुक्रवारी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तब्बल दोन तास जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली तर जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शेतक-यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून पिकांच्या नुकसानीमुळे चिंता व्यक्त होत आहे.

गुरूवारी रात्री रिमझिम पाऊस आल्यानंतर शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. दरम्यान सकाळी ९ वाजेच्या सुमारत विजेच्या कडकडाटासह सर्वत्रजोरदार पावसाला सुरूवात झाली. सतत दोन तास पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे अनेक ठिकाणच्या नाल्यांना पूर आला. या पावसामुळे शहरातील रामनगर, धाड नाका, जयस्तंभ चौक, जनता चौक, कारंजा चौक, जांभरूण रस्ता, संगम चौक आदी ठिकाणी पाणी जमा झाल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. पावसाच्या जोरामुळे बुलडाणा-मलकापूर मार्ग काही काळ बंद ठेवावा लागला तर रात्री झालेल्या रिमझिम पाऊस व सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सागवन परिसरात असलेल्या पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे चिखली रस्त्यावरील पुलावर पाण्याचा जलस्तर वाढला. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी पुलावरील पाणी ओसरल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात आली.या पावसामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागता. बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित प्रवाशांना वाहतूक बंद असल्यामुळे थांबावे लागले.पावसाचा अंदाज घेत प्रत्येक बस सोडण्यात येत असल्यामुळे अनेक प्रवासी बसस्थानक परिसरात दिसून आले. दुपारी पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्वत्र धुके पसरले होते. या काळात लाईन बंद झाल्यामुळे त्याचा व्यापा-यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.

जिल्ह्यात सकाळपर्यंत सरासरी १६.४ मि.मी. पाऊस यावर्षी सुरवातीपासून अल्प प्रमाणात येणा-या पावसाने आज सकाळी जोरदार हजेरी लावून मोठ्या प्रमाणात असलेलेली पावसाची तुट भरून काढली. शुक्रवारी सकाळी १० ते १२  वाजेदरम्यान जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सकाळी ८वाजेपर्यंत एकूण २१३ मि.मी. म्हणजे सरासरी १६.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस बुलडाणा तालुक्यात ५३ मि.मी. झाला आहे. चिखली तालुक्यात २ मि.मी., देऊळगाव राजा १४, सिंदखेड राजा १, लोणर ८, मेहकर ४४, शेगाव ४१, मलकापूर २०, नांदूरा ६, मोताळा १४, संग्रामपूर १० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.