शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव येथील संतप्त शेतक-यांना मिळाले रोहित्र

By admin | Updated: November 22, 2015 02:15 IST

शेतक-यांना तातडीने रोहित्र बसवून दिल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

चिखली(जि. बुलडाणा) : खरिपाची पिके हातची गेली; मात्र रब्बीच्या आशेवर असलेल्या नायगाव बु.येथील शेतकर्‍यांचे रोहित्र जळून १५ दिवस उलटले तरीही ती बदलून मिळत नसल्याने शेतातील पिके वाळत असल्याचे पाहून हताश झालेले शेतकरी २0 नोव्हेंबर रोजी विद्युत पोलवर चढले होते. ही माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नायगाव बु.गाठून संतप्त शेतकर्‍यांना खाली उतरविले. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून याकामी पुढाकार घेत तातडीने रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर नायगाव बु. हे गाव वसलेले आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांची संपूर्ण मदार रब्बी पिकांवर अवलंबून आहे; मात्र ऐन पिकांना पाणी देण्याच्या वेळेस रोहित्र जळाल्याने शेतकर्‍यांना वारंवार महावितरणच्या कार्यालयात चकरा माराव्या लागल्या, एवढे करूनही रोहित्र बदलविण्यात न आल्याने जेमतेम डोके वर काढलेल्या रब्बी पिकांची अवस्था बिकट होत चाचली होती. दरम्यान, संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे रोहित्र जळाल्याचा रिपोर्टही उशिरा जात असल्याच्या तक्रारी असून, शेतकर्‍यांनी बिलाची रक्कम भरली असतानाही १५ दिवस उलटूनही रोहित्र मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकरी २0 नोव्हेंबर रोजी थेट जळालेल्या डी.पी.वर चढले. ही माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत यांनी तातडीने नायगाव बु. गाव गाठले व रोहित्रावर बसलेल्या शेतकर्‍यांना खाली उतरवून घेत त्यांना रोहित्र मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, तेथूनच वीज वितरणचे कार्यकारी अभियंता शेगोकार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली असता शेगोकार यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकर्‍यांना तातडीने रोहित्र बसवून दिल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दिलीप जंजाळ, विष्णू जवंजाळ, अशोक मोरे, राजू जंजाळ, धोंडूबा कापसे, पांडुरंग अंभोरे, उमेश पंखुले, सुधाकर जवंजाळ, विठ्ठल जवंजाळ, मोहन फोकाटे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.