खामगाव : तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ह्यगट अह्णच्या चार व वैद्यकीय अधिकारी ह्यगट बह्णच्या चार पदांसह इतरही रिक्त पदे असल्याने तालुक्यातील आरोग्य विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.खामगाव तालुक्यात बोथाकाजी, अटाळी, गणेशपूर, रोहणा व पिंपळगाव राजा या पाच ठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी ह्यगट अह्णची दोन पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत यापैकी बोथाकाजी केंद्रातील ह्यगट अह्णची दोन्ही पदे रिक्त आहेत, तर रोहणा व अटाळी केंद्रावरील एक पद रिक्त आहे. येथील कारभार प्रभारींवर सुरू आहे. अटाळी, पिंपळगाव राजा केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी ह्यगट बह्णची चार पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. यामुळे दररोज रुग्णतपासणी करताना प्रभारी डॉक्टरांना घामाघूम व्हावे लागते.आरोग्य विभागामार्फत वर्षभर विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविले जात असताना वैद्यकीय अधिकार्यांअभावी उर्वरित कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वैद्यकीय अधिकार्यासोबत आरोग्य सेवकांची पिंपळगाव राजा येथे चार, अटाळी व बोथाकाजी येथे तीन व गणेशपूर येथे एक अशी ११ पदे, आरोग्य सहायकाचे तालुका कार्यालयात एक, अटाळी येथे दोन, तर गणेशपूर, पिंपळगाव राजा व बोथाकाजी येथे एक अशी सहा पदे तसेच स्वास्थ अभ्यंगता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारक, वाहनचालक, सफाई कामगार यांचीही पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याची हमी घेतलेल्या शासनाने ही रिक्त पदे भरणे गरजेचे झाले आहे.