शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

हरियाणातील बनावट डॉक्टरची खामगावात प्रॅक्टीस

By अनिल गवई | Updated: June 10, 2023 15:13 IST

खामगाव शहर पोलीसांची कारवाई : पाच लाखाच्या मुद्देमालासह डॉक्टर जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विविध असाध्य आजारावर रामबाण इलाज करण्याच्या उद्देशाने खामगावात वैद्यकीय प्रॅक्टीस करणार्या एका हरियाणातील बनावट डॉक्टरला खामगाव शहर पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. या बनावट डॉक्टरकडून एका कारसह पाच लाखांची औषधी जप्त करण्यात आली.

याबाबत सविस्तर असे की, शहरातील वामन नगर परिसरात विविध असाध्य अाजाराच्या रूग्णांवर उपचार करण्याच्या उद्देशाने हरियाणातील जितेंद्रकुमार महासिंग शर्मा ३५ (रा. पाडा, ता. असंद जि. कर्नाल) हा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार करण्याचे प्रमाणपत्र नसताना विना परवाना अौषधी साठा करताना आढळून आला. यावेळी त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडून उत्तरप्रदेशातील जे.जे. आयुर्वेदिक दवाखान्याचे मुदतबाह्य प्रमाणपत्र, विविध कंपनीचा औषधसाठा, पिवळ्या आणि लाल रंगामध्ये जाहिरात पत्रके, पाढर्या रंगाची कार क्रं.डीएल -२सी – एएल- २१२२ असा एकुण चार लक्ष ८३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खामगाव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पेसोडे यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात कलम, ३३,३३(अ), ३८ महाराष्ट्र वैदयकीय व्यावसायीक अधिनियम १९६१ सहकलम ४,७ ड्रग्ज अॅण्ड मॅजीव रेमीडीज अँक्ट १९५४ च्या विविध कलमान्वये शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.चौकट...

विविध औषधांचा साठा जप्तविविध आजारांवर गुणकारी अशा औषध साठ्यासह , कागदी लेबल, प्लास्टीक बॉटल, तुलसी, गिलोय रस,

विविध रंगाची पावडर स्वरूपातील औषधी, चूर्ण, पॅकींग बॅग, तेल, रंगबेरंगी गोळ्या असा साठा यावेळी पोलीसांनी आरोपींकडून जप्त केला.

टॅग्स :doctorडॉक्टर