शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाव नसल्याने शेतकरी हैराण! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:53 IST

मेहकर : सोयाबीन पीक निघायला सुरुवात झाली असून, ४ ऑ क्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे;  मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी  हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देतीन हजार क्विंटल सोयाबीनची आवकउडीद, मूग खरेदीसाठी नाफेडमार्फत नोंदणी सुरुसोयाबीनचे अनुदान अद्याप आलेच नाही!

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : सोयाबीन पीक निघायला सुरुवात झाली असून, ४ ऑ क्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे;  मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी  हैराण झाले आहेत.मेहकर तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी-अधिक होते.  पावसाळ्याच्या सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात पाऊस चांगला  पडला असला तरीपण त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने  याचा परिणाम सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांवर झाला  आहे. अनेक शेतकर्‍यांना एका एकरामध्ये केवळ ३ ते ४  िक्वंटलची झडती लागली आहे. शेतकर्‍यांना विविध बँकांकडून  पेरणीच्या वेळेवर पीक कर्ज मिळाले नसल्याने बहुतांश शे तकर्‍यांनी उसनवार करून तर उधारीवर बी-बियाणे, खते खरेदी  करुन पेरणी केली आहे; मात्र पावसाने सुद्धा वेळेवर साथ  दिल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पाहिजे त्या  प्रमाणात पिकांचे उत्पादन झाले नाही तर बाजारात सोयाबीनला २  हजार ५00 रुपये ते २ हजार ८00 रुपयेच भाव आहे. उडीद,  मूग, तूर, चणा, गहू या पिकांनासुद्धा भाव नाहीत. शेतात  पेरणीसाठी लागलेला खर्चसुद्धा निघतो का नाही, असा प्रश्न शे तकर्‍यांना पडला आहे, तर पेरणीसाठी लोकांकडून आणलेले  पैसे, इतर उसनवार कशी फेडावी, या विवंचनेत शेतकरी दिसत  आहेत. नुकताच दसरा सण झाला असून, दिवाळी अवघ्या  काही दिवसावर आली आहे. पिकांच्या उत्पादनात झालेली घट, बाजारात पिकांना भाव नसणे,  यामुळे दिवाळी साजरी कशी करायची, या चिंतेत शेतकरी आहे त. त्यामुळे शासनाने आता शेतकर्‍यांच्या पिकांना चांगला भाव  देऊन शेतकर्‍यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, हीच अपेक्षा  शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. 

उडीद, मूग खरेदीसाठी नाफेडमार्फत नोंदणी सुरु    दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पिकांच्या उत्पादनातही  घट होत चालली आहे. आलेल्या पिकांना मार्केटमध्ये भाव  नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत  शासनाने उडीद व मूग नाफेड मार्फत खरेदी करुन उडीद व  मुगाला हमीभाव देण्यात येणार आहे. मूग ५ हजार ५७५ रुपये तर  उडीद ५ हजार ४00 रुपये भावाने खरेदी करण्यात येणार आहे.  त्यासाठी शेतकर्‍यांनी २0१७-१८ चा सात-बारा, पीक पेरा पत्रक, त्या पत्रकावर उडीद, मुगाचा उल्लेख असावा, बँकेची  पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड व मोबाइल नंबर ही सर्व कागदपत्रे  नाफेड केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करुन घ्यावी, असे  खरेदी-विक्री संघाने कळविले आहे. 

सोयाबीनचे अनुदान अद्याप आलेच नाही!मागील वर्षी सोयाबीनची आवक चांगल्या प्रमाणात झाली होती;  परंतु बाजारात सोयाबीनला भाव नव्हते. त्यामुळे शासनाने शे तकर्‍यांना मदत करण्याच्या उद्देशाने सोयाबीनला प्रति क्विंटल  २00 रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे हजारो शे तकर्‍यांनी या अनुदानासाठी नोंदणी करुन दिलेली आहे; मात्र  गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून या अनुदानाचे मेहकर तालुक्यातील  जवळपास दीड कोटी रुपये शासनाकडे थकीत असून,  शासनाच्या निष्काळजीमुळे शेतकरी मात्र परेशान झाले आहेत.