शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गुटखाविक्री बंदीचा फज्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2015 01:42 IST

देऊळगाव राजा येथे गल्लीबोळीत होते खुलेआम गुटखा पुड्यांची विक्री.

मलकापूर (जि. बुलडाणा): सुरक्षित व आरामदायी प्रवास व्हावा म्हणून प्रवासी खासगी वाहनांपेक्षा राज्य परिवहन मंडळाच्या बसला प्राधान्य देतात; परंतु प्रवासी हेच आमचे दैवत असे घोषवाक्य असणार्‍या एसटी महामंडळाकडूनच प्रवाशांची गैरसोय होत आहे. मलकापूर बस स्थानकावरील समस्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भाचे प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणार्‍या मलकापूर शहर येथील बसस्थानकात खड्यांची भरमार आहे. बसस् थानकात प्रवेश केल्यावर बस खड्डयातून जात असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसतो. बसस्थानक परिसराच्या सभोवताल दुर्गंधीही पसरली असल्याने या समस्येपासून मुक्त करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापनासमोर आहे. बसस्थानकाच्या इन व आऊट प्रवेशव्दारावरील मार्गावरील डांबर उखडलेले असल्याने गिट्टी सर्वत्र पसरली आहे. या बसस्थानकापासून राज्य परिवहन मंडळाला प्रतिदिन लाखो रूपयाची कमाई प्राप्त होते. परंतु प्रवाशांच्या समस्यांकडे स्थानिक बसस्थानक प्रमुख कोणतेही लक्ष देत नाही. प्रवाशांना सुविधा व्हावी या उद्देशाने राज्य परिवहन निगमची स्थापना करण्यात आली आहे. बहुजन हिताच बहुजन सुखाय या ब्रिद वाक्याने हा व्यवसाय सुरू झाला. परंतु समय बिताओ और पैसा कमाओ या धर्तीवर काम करणार्‍या परिवहन अधिकार्‍यांच्या प्रतापामुळे त्रस्त होऊन प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसकडे किंवा काळी-पिवळी कडे धाव घ्यावी लागते. मलकापूर बसस्थानकाची समस्या मुख्य प्रवेशव्दारापासून सुरू होते. शहरातील या मुख्य बसस्थानकातील समस्या मोठी आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुटीला प्रारंभ झाला असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. बसस्थानकात विजेची समस्या नाही. परंतु स्वच्छतेबाबत उदासिनता दिसुन येते. फलाट व प्रवासी बसत असलेल्या ठिकाणी स्वच्छता दिसून येते. परंतु बसस् थानकाच्या सभोवताल स्वच्छतेच्या मोहीमेला हरताळ फासलेला दिसतो. बसस्थानक परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण आहे येथे मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता दिसुन येते बसस्थानकात पुरूष व महिला प्रसाधनगृह असले तरी पुरूष मंडळी बसस्थानक परिसरात उघड्यावर मुतारीसाठी जातात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले आहे.