शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ५0 लाख रूपयांचा गुटखा जप्त

By admin | Updated: September 12, 2014 00:25 IST

गुटखा पुड्यांची २१९ पोते जप्त; आरोपीस अटक; गुन्हा दाखल.

मलकापूर : गुटखा पुड्यांवर महाराष्ट्रात बंदी असताना, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पोलिसांनी गुरूवारी तब्बल ५0 लाख रूपयांचा गुटखा पुड्यांचा साठा जप्त केला.गुटखा पुड्यांची अवैध विक्री बुलडाण्यात सर्रास सुरू असून, या जिल्ह्यातील मलकापूर शहरात अवैध गुटखा मोठा प्रमाणात आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार बुधवारी रात्रीच मलकापूर येथे दाखल झाले होते. या पथकाने सापळा रचून, गुरूवारी राधाकिसन चाळमधील जगदीश चिरंजीवलाल अग्रवाल यांच्या घरी तसेच गोदामावर छापा टाकला. यावेळी विमल व नजर या गुटखा पुड्यांची २१९ पोते आढळून आली. जवळपास ५0 लाख रूपयांचा हा संपूर्ण माल जप्त करण्यात आला. आरोपी जगदीश अग्रवाल यास अटक करून शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा अधिकारी भाऊराव चव्हाण यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी जगदीश चिरंजीवलाल अग्रवाल याच्याविरुध्द भादंविचे कलम १८८, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा मानके कलम ५९ (१) (२) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.