शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकारी, बीडीओ यांना कोंडले कक्षात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 01:24 IST

संग्रामपूर येथे शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांवर शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.

संग्रामपूर (जि. बुलडाणा), दि. २९: स्थानिक संग्रामपूर शहरातील जिल्हा परिषद शाळेत गेल्या तीन महिन्यांपासून केवळ १२ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे रिक्त असलेली आठ पदे भरण्यासाठी विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना बीडीओच्या कक्षात कोंडून ठेवले. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळांचे सत्र सुरू झाले आहे; मात्र संग्रामपूर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत वर्ग (तुकड्या) १५ व शिक्षक १२ आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या आठ शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. रिक्त असलेले शिक्षकांचे पद भरण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदनही दिले होते व या निवेदनाद्वारे बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता; मात्र या निवेदनाची शिक्षण विभागाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे अखेर २९ ऑगस्ट रोजी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविले नाही. स्वयंस्फूर्तीने एकही विद्यार्थी शाळेत २९ ऑगस्ट रोजी आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याविनाच शिक्षकांना शाळा भरावी लागली व विद्यार्थीविनाच राष्ट्रगीत झाले, तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ता अभयसिंह मारोडे यांनी संग्रामपूर येथील याच जिल्हा परिषदेच्या शाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याच्या मागणीसाठी विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना विस्तार अधिकार्‍यांच्या कक्षात कोंडून ठेवून आंदोलन केले. यावेळी या आंदोलनात बाबूलाल इंगळे, ऋषीकेश मारोडे, योगेश नेरकर आदी सहभागी झाले होते.