ते २७ मे रोजी स्थानिक समर्थ अर्बन मेहकरच्या वतीने स्व. विलासराव देशमुख यांच्या ७६ व्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंगणवाडी निवड समितीचे अध्यक्ष गणेश बोचरे, ॲड. किशोर धोंडगे, दिगंबर अण्णा देशमुख, ॲड. गजानन लांडगे, ॲड. विनोद नरवाडे, ॲड. विनोद डव्हळे, ॲड. भगवान भराड, ॲड. संदीप वाघमारे, ॲड. झिशान खान, दत्ता उमाळे, भरत सारडा, किसनराव देशमुख, निलेश ईनकर, बाळाभाऊ वानखेडे, सरपंच संजय सुळकर, गजानन सोभागे, फिरोज खान, ॲड. रजनीकांत कांबळे, विलास वाघ, व्यवस्थापक रामेश्वर मोरे, रवींद्र कुंभार, महादेव वाघमारे, दिनेश बोरकर, सचिन निकस हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. लक्ष्मण ठाकरे यांनी केले. आभार गणेश मोसंबे यांनी मानले.
विलासराव देशमुख यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST