बुलडाणा : स्थानिक बसस्थानक परिसरात राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी बुलडाणा शहर वंजारी समाज बांधवाच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेला देवानंद ताठे तर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पंढरीनाथ वाघ यांनी पुष्पहार अर्पण केला. देवानंद ताठे यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सर्व समाजबांधवांच्यावतीने भगवान बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला मधुकरराव जायभाये, बी. एम. कायंदे, प्रल्हादराव काळुसे, दीपकराव वारे, अरविंद ताठे, डॉ. रवींद्र वाघ, पंढरीनाथ वाघ, गणेश लक्ष्मण वाघ, संजय प्रल्हाद सोनुने, रंगनाथ पंढरीनाथ मुंढे, प्रदीप श्रीधर मांटे, शिवनारायण भगवान, गजानन मुळे, अण्णा गंगाराम वाघ, देवानंद नारायण ताठे, संजय एकनाथ नागरे, अनिल वामनराव वारे, राजू वाघ, संजय ज्ञानेदव वारे, देवराव खार्डे, गणेश लक्ष्मण गरकळ, शरद सीताराम नागरे, शरद श्रीराम नागरे, प्रवीण ग्यानदेव थोरात, विशाल उद्धवराव नागरे, विलास काकड, ज्ञानेश्वर तारे आदी वंजारी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
बुलडाणा भगवान बाबा यांना वंजारी समाजबांधवांनी अभिवादन केले.