राजू रज्जाक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतरोद्दीन काझी होते, तर प्रमुख उपस्थितीत प्रशांत डोंगरदिवे, डॉ.म.ईसरार, नगरसेवक रफीक कुरेशी, मो.आसिफ, दीपक खरात, हाजी तालीब खान, जकाउल्ला ठेकेदार, खलील बागवान होते. शहीद अब्दुल हमीद यांनी १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात अत्यंत मोलाची कामगीरी बजावत पाकिस्तानचे सात टँक उडविले होते. स्वतंत्र भारत देशातील पहिले शहीद व परमवीर चक्राने सन्मानित होतो. आज देश व देशातील नागरिक त्यांच्या त्याग व देशसेवेचे स्मरण चिखली येथील वार्ड क्रमांक ९ शहीद अब्दुल हमीदनगरद्वारे कायम होत राहील, असा आशावाद प्रशांत डोंगरदिवे यांनी यावेळी व्यक्त केला. यशस्वितेसाठी मलिक जामदार, हनीफ बाबा, खालिद पठाण, अजीज जामदार, रफीक, अश्फाक मिस्त्री, शफी मिस्त्री, अजदानी बॉस, सादिक जमदार, अब्दुल मिस्त्री, अकरम बागवान, शफी बेपरी, सरू मिस्त्री, सईद, रफीक मौलाना, शकील, एजाज, मुस्ताक बागवान, सद्दाम आदी युवकांनी परिश्रम घेतले.
शहीद अब्दुल हमीद यांना अभिवादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST