शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयास हिरवा कंदील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:57 IST

सिंदखेडराजा : साखरखेर्डा गावाची लोकसंख्या पाहता येथे  तत्कालीन आरोग्यमंत्री तथा मातृतीर्थ सिंदखेडराजा म तदारसंघाचे माजी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी ग्रामीण  रुग्णालय मंजूर केले होते; परंतु १0 वर्षापासून मंजूर झालेल्या  या ग्रामीण रुग्णालयालाच्या कामाला मुहूर्त सापडत नव्हता.  दरम्यान बुधवारला साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या  उभारणीसाठी आरोग्य मंत्री सावंत यांनी एक कोटी रुपये निधी  उपलब्ध करून दिल्याने या ग्रामीण रुग्णालयाला हिरवा  कंदील मिळाला आहे.

ठळक मुद्देदहा वर्षांपासून केवळ मंजुरात रुग्णालयाच्या उभारणीसाठी एक कोटी निधी प्राप्त

अशोक इंगळे । लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डा गावाची लोकसंख्या पाहता येथे  तत्कालीन आरोग्यमंत्री तथा मातृतीर्थ सिंदखेडराजा म तदारसंघाचे माजी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी ग्रामीण  रुग्णालय मंजूर केले होते; परंतु १0 वर्षापासून मंजूर झालेल्या  या ग्रामीण रुग्णालयालाच्या कामाला मुहूर्त सापडत नव्हता.  दरम्यान बुधवारला साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या  उभारणीसाठी आरोग्य मंत्री सावंत यांनी एक कोटी रुपये निधी  उपलब्ध करून दिल्याने या ग्रामीण रुग्णालयाला हिरवा  कंदील मिळाला आहे.मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावाची  लोकसंख्या पाहता येथे तत्कालीन आरोग्यमंत्री तथा मातृतीर्थ  सिंदखेडराजा मतदारसंघाचे आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी  ग्रामीण रुग्णालय मंजूर केले होते. मंजूर झालेल्या ग्रामीण  रुग्णालयाची दहा वर्षांपासून ग्रामस्थांना प्रतीक्षा होती.   साखरखेर्डा हे गाव सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात मोठे गाव  असून, लोकसंख्या २0 हजार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रा त डॉक्टरांची रिक्तपदे प्राथमिक सुविधांचा अभाव या सर्व  बाबी लक्षात घेता आणि २२ खेड्यांची लोकसंख्या गृहीत  धरून येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, म्हणून सतत मागणी  करण्यात येत होती. तत्कालीन आ.डॉ.राजेंद्र शिंगणे,  आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालय आणि  शेंदुर्जन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरात दिली होती; परंतु  हा प्रश्न १0 वर्षांपासून प्रलंबित पडला होता. अनेक वेळा ग्रामपंचायतीने जागेची फाइल सादर करूनही द प्तर दिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न रेंगाळत पडला हो ता. आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनासुद्धा ग्रामीण  रुग्णालयासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.  आ.डॉ.शशिकांत खेडेकर, खा.प्रतापराव जाधव, शिवसेना  उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे, सरपंच महेंद्र पाटील, युवा सेना  उपजिल्हा प्रमुख संदीप मगर, मतदारसंघ संपर्क प्रमुख  अजयसिंह ठाकूर यांनी आरोग्यमंत्री ना.दीपक सावंत यांना प्र त्यक्ष मंत्रालयात भेटून संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून प्रस् ताव सादर केले.   दरम्यान, साखरखेर्डा येथील ग्रामीण  रुग्णालयाच्या उभारणीसाठी आरोग्यमंत्री सावंत यांनी एक  कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने या ग्रामीण  रुग्णालयाला हिरवा कंदील मिळाला आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीचे आदेशसाखरखेर्डा येथील युवा नेते महेंद्र पाटील यांनी ग्रामीण  रुग्णालयासाठी जागा निश्‍चित करून ग्रामीण रुग्णालयासाठी  तत्काळ मंजुरात द्यावी, असे पत्र आ.डॉ. शशिकांत खेडेकर  यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना मुंबई येथे बुधवारी सादर  केले. यावेळी ना.सावंत यांनी संबंधित अधिकार्‍यांना ग्रामीण  रुग्णालयाच्या उभारणीसाठी आदेश दिले. त्यांनी तत्त्वत:  मान्यता देऊन लवकरच ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू  होईल, असे आश्‍वासन खा.प्रतापराव जाधव,  आ.डॉ.शशिकांत खेडेकर आणि सरपंच महेंद्र पाटील यांना  दिले.