शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहराजवळील जंगलात वन पर्यटनाला मोठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

सिंदखेडराजा शहराच्या १० किलोमीटर परिसरात वनविभागाची जवळपास ५ हजार एकर जमीन आहे. त्यापैकी नशिराबाद, शिवणी आणि अंचली या ...

सिंदखेडराजा शहराच्या १० किलोमीटर परिसरात वनविभागाची जवळपास ५ हजार एकर जमीन आहे. त्यापैकी नशिराबाद, शिवणी आणि अंचली या गावांजवळ तीनशे हेक्टर वनसंपदा असलेल्या पट्ट्यात वन पर्यटन केले गेल्यास या भागातील हा मोठा नैसर्गिक प्रकल्प होऊ शकतो. डिसेंबर २० मध्ये नागपूरमधील गोरेवाडा येथे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय वन पर्यटन आणि प्राणी उद्यान अस्तित्वात आले आहे. १ हजार हेक्टरवर हा प्रकल्प उभा असून येथे बंदिस्त प्राणिसंग्रहालय, वन उद्यान, जंगल सफारी असे अनेक अनुभव घेता येतात. अल्पावधीत या प्रकल्पाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

नागपूरमधील याच प्रकल्पाच्या धर्तीवर सिंदखेडराजा परिघातील वनजमिनीवर असा प्रकल्प उभा राहिल्यास मध्य महाराष्ट्रातील हा एक महत्त्वाचा वन पर्यटन प्रकल्प ठरू शकतो. या भागात विपुल वनसंपदेसह अनेक जंगली प्राणी, नैसर्गिक पाणवठे, पाझर तलाव मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रित येऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याची आणि राजकीय व्यवस्थेने याला पाठबळ देण्याची गरज आहे.

दरम्यान, शहरातील युवा कार्यकर्ते राजेंद्र आंभौर, संदीप मेहेत्रे, शिवानी येथील सरपंच तांबेकर, पत्रकार नंदू वाघमारे यांनी नुकतीच ८ किमी परिसरात फिरून या संपूर्ण जंगलाची माहिती घेतली. या संदर्भातील एक व्हिडिओ अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू असून वन पर्यटन या भागात किती महत्त्वाचे आहे या बाबत ही टीम सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनाही या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. व्हिडिओ अहवाल तयार झाल्यास पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना तो सुपूर्द करण्यात येणार आहे.

समृद्धी, स्मार्ट सिटी आणि वन पर्यटन

महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. १ मे रोजी नागपूर, शिर्डीपर्यंत हा महामार्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. समृद्धी सिंदखेडराजा शहराच्या एक किमी जवळून गेला आहे तर सावरगाव माळ परिसरात समृद्धीची स्मार्ट सिटी वसवली जाणार आहे. यात कृषीवर आधारित उद्योग प्राधान्याने घेतले जाणार आहेत. वन पर्यटन प्रकल्प ज्या वनविभागाच्या जमिनीवर बसविण्याची मागणी होत आहे तो जंगलपट्टा समृद्धी आणि समृद्धी स्मार्ट सिटीपासून जवळ आहे. याच भागात स्मार्ट सिटीचा इंटरचेंज असल्याने या वन पर्यटन प्रकल्पात येण्या-जाण्यासाठी मोठी सुविधा होणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा राबता या प्रकल्पात नक्कीच पाहायला मिळेल.

--

:: जंगलाचे फोटो आणि पाहणी करण्यासाठी गेलेली टीम