शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठीच महापुरूषांचा लढा: संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:39 IST

खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यापासून आपण कोसोदूर असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी येथे व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यापासून आपण कोसोदूर असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी येथे व्यक्त केली.

रावबहाद्दूर केशवराव जानराव देशमुख यांच्यावतीने आयोजित शिक्षण परिषदेच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित सामाजिक ऐक्य परिषद तथा श्रीमंत शिवाजीराव वामनराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, मानवाधिकार आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे, नगराध्यक्षा अनिता डवरे, शिवाजीराजे जाधव, इंद्रसेन देशमुख , जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्ष नाझेर काझी, माजी आमदार माणिकराव गावंडे, माजी आमदार नाना कोकरे, दादासाहेब कविश्वर यांच्यासह सत्कारमूर्ती श्रीमंत शिवाजीराव वामनराव देशमुख, सुमती देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी  संभाजी राजे म्हणाले की, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी चारही महापुरूषांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवाचे रान केले. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाती व्यवस्थेची संकल्पना अजिबात मान्य नव्हती. मात्र, आम्ही आजही या महापुरूषांनाच जाती-जातीत विभागायला निघालो आहोत. हेच आजच्या समाजव्यवस्थेचे अपयश आहे. मात्र, शिवाजीराव देशमुख  यांच्या सारख्या काही मोजक्या लोकांकडून  महापुरुषांच्या आदर्श जोपासल्या जात आहे. त्यामुळे ते नव्या पिढीसाठी आशेची किरणं असल्याचेही संभाजी राजे शेवटी म्हणाले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देवेंद्र देशमुख, सौ. शीतल देशमुख, अभिषेक देशमुख, सौ.राधिका देशमुख, सयाजी देशमुख, आर्यमन देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक देवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश मिरगे यांनी केले. आभार तेजेंद्रसिंह चव्हाण यांनी मानले.

स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही!

खामगाव शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाचे काम गतीने पुढे न्यावे. या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, महापुरूषांना जाती धर्मात आणि राजकारणात अडकवू नका, असे आवाहनही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी केले. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती