शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

१९३0 शेतकर्‍यांचे ४ कोटी १४ लाखाचे अनुदान रखडले

By admin | Updated: June 28, 2014 22:40 IST

१९३0 शेतकर्‍यांचे तब्बल ४ कोटी १४ लाख १७ हजार रु. अनुदान अद्यापपर्यंत शासनाने दिले नसल्याने

धाड : कमी पाण्याचा वापर होऊन कृषी उत्पादन घेण्यासाठी ह्यसुक्ष्म सिंचनह्ण योजना सर्वत्र राबवली. यासाठी शेतकर्‍यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन संचावर अनुदान देऊन प्रोत्साहन दिले. मात्र बुलडाणा तालुक्यात आजरोजी गेल्या वर्षभरापासून १९३0 शेतकर्‍यांचे तब्बल ४ कोटी १४ लाख १७ हजार रु. अनुदान अद्यापपर्यंत शासनाने दिले नसल्याने या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.सन २0१३ मध्ये बुलडाणा तालुक्यातून २७५६ शेतकर्‍यांचे अनुदान प्रस्ताव कृषी विभागास प्राप्त झाले. पैकी कृषी विभागास सन २0१३ मध्ये १ कोटी ३७ लाख ३ हजार रु. निधी प्राप्त झाला. यामधून कृषी विभागाने ८२६ शेतकर्‍यांचे प्रस्ताव मार्गी लावत अनुदान वाटप केले. तर आज १९३0 शेतकर्‍यांचे प्रस्ताव प्रलंबित पडून असल्याने ते आर्थिक अडचणीत आहेत. कृषी विभागाकडून सुक्ष्म सिंचन योजनेत ठिबक व तुषार सिंचन संचाचे खरेदीवर अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांस ७५ टक्के अनुदान तर सर्वसाधारण भूधारक शेतकर्‍यांस ५0 टक्के अनुदान देणारी ही प्रभावी योजना आहे. ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच हे शेतकर्‍यांनी स्थानिक पातळीवर दुकानदारांकडून पूर्ण किमतीनी खरेदी करुन आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन अनुदानाचा प्रस्ताव कृषी विभागाचे कार्यालयात सादर करावा. याठिकाणी सर्व प्रकरणांची ऑनलाईन नोंदी होऊन शासनाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर थेट अनुदान हे शेतकर्‍यांचे खात्यात जमा होते.पुर्वी मात्र स्थानिक पातळीवरील कृषी दुकानदार हे शासकीय अनुदान रक्कम वगळून ठिबक व तुषार संच शेतकर्‍यांना विक्री करत आणि नंतर मिळवीत यामध्ये शेतकर्‍यांना शासकीय कार्यालयाच्या येरझार्‍यातून सुटका मिळत होती. परंतु गेल्या काही वर्षात ही पद्धत शासनाने बदलल्याने शेतकर्‍यांना आपल्या अनुदानासाठी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिवण्याची वेळ आली आहे.यामध्ये प्रत्येक शेतकर्‍यास नगदी रोख रक्कम पूर्ण भरुन ठिबक व तुषार संच खरेदी करावे लागतात, यासाठी बहुतांश शेतकर्‍यांनी कर्ज काढून हे संच खरेदी केली आहे. मात्र अनुदान न दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.