शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

प्लेटवरून ‘दादा’ निघेनात

By admin | Updated: March 24, 2015 01:02 IST

परिवहन विभागाचे दुर्लक्ष ; उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली.

खामगाव (जि. बुलडाणा): गाड्यांच्या नंबर प्लेटवर ह्यदादाह्ण, ह्यबाबाह्ण, ह्यभाईह्ण यांसारखी अक्षरे दिसणारे आकडे लावणार्‍या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणार्‍यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना नोटीस बजावली आहे; मात्र नोटीस बजावल्यानंतर आरटीओ, पोलिसांकडून गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत कोणतीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे नंबर प्लेटवरील दादा, भाऊ, मोदी, पाटील ह्यजैसे थेह्ण असल्याचे चित्र आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार, फॅन्सी नंबर प्लेट लावणे गुन्हा ठरतो; परंतु शहरातील बहुतांश चारचाकी वाहनांवर दादा, बाबा, भाऊ, नमो, करण, पवन, पाटील, मराठा, आणि इतरही नावसदृश नंबर प्लेट आढळून येतात. इतकेच काय तर पोलीस ठाणे आणि जिल्हा न्यायालय परिसरातही अशा प्रकारच्या नंबर प्लेट असणार्‍या गाड्या पार्क केलेल्या आढळतात. दरम्यान, केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार नंबर प्लेट या इंग्रजी अरोबिक फॉन्टमध्येच असाव्यात, असे अधिसूचित केले आहे. त्याशिवाय हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी व इ तरही भारतीय भाषांमधील नंबर प्लेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही भारतीय भाषांमधील नंबर प्लेटचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील दुरुस् तीला देशभरातील विविध राज्यांनी अंमलात आणले आहे; परंतु महाराष्ट्र सरकारने अद्याप दुरुस्ती लागू केलेली नाही. केंद्रीय कायद्यातील तरतुदींचे पालन व्हावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राज्य सरकारांना सुधारित नियम लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत, मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्देशाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कारवाई होत नसल्यामुळे शहरात फॅन्सी नंबरप्लेट लावणार्‍यांमध्ये स्पर्धाच लागली असल्याचे चित्र आहे.