शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश दाम्पत्य अनुभवतेय ग्रामसंस्कृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:10 IST

बुलडाणा : भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे मूळ हे ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ग्राम संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सण, उत्सव जवळून पाहण्यासाठी एक ब्रिटिश दाम्पत्य महिनाभरासाठी महाराष्ट्रात आले आहे. या ब्रिटिश दाम्पत्याने १३ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या सप्तऋषींपैकी गोमेधर येथील मंदिर परिसर पाहून कुतूहल व्यक्त केले.

ठळक मुद्देगोमेधरच्या मंदिराला भेट सण, उत्सवाचे करणार निरिक्षण

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे मूळ हे ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ग्राम संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सण, उत्सव जवळून पाहण्यासाठी एक ब्रिटिश दाम्पत्य महिनाभरासाठी महाराष्ट्रात आले आहे. या ब्रिटिश दाम्पत्याने १३ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या सप्तऋषींपैकी गोमेधर येथील मंदिर परिसर पाहून कुतूहल व्यक्त केले. भारतीय संस्कृती व परंपरा सुरूवातीपासूनच इतर देशांना आकर्षित करते.  भारतीय सण-उत्सव,  संस्कृतीचा मिलाप, ऐतिहासिक वास्तू, हेमाडपंथी मंदिरांचा ठेवा जगाला भुरळ घालणारा आहे. येथील पर्यटन स्थळाचे महत्व विशेष असल्याने इतर देशातूनही पर्यटकांचा ओढा भारतात वाढत आहे. मात्र, केवळ पर्यटनस्थळ पाहण्यासाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती व येथील सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा जवळून पाहण्यासाठी  इंग्लंड येथील रॅमसे व रती नावाचे एक दाम्पत्य महिनाभरासाठी महाराष्ट्रात आले आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल राहत असल्याने ५ ऑगस्टला रॅमसे व रती हे ब्रिटिश दाम्पत्य महाराष्ट्रात आले. अमरावती येथील वैभव मेंडसे हे इंग्लंडला राहत असून, त्यांच्यासोबत ब्रिटिश दाम्पत्य आले आहे. रविवारला हे ब्रिटिश दाम्पत्य बुलडाणा जिल्ह्यात आले होते. त्यांनी जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. त्यामध्ये  त्यांनी जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या सप्तऋषींपैकी  निसर्गरम्य वातावरण व टेकड्यांच्यामध्ये वसलेल्या गोमेधर येथील गौतमेश्‍वर संस्थनला भेट देऊन परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांनी काही शब्द मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच मंदिर व परिसराची संपुर्ण माहिती जाणून घेतली. महिनाभरासाठी आलेल्या या ब्रिटिश दाम्पत्याला भारतीय संस्कृतीची भूरळ पडली असून,  भारतीय संस्कृती ही गावात असल्याने गावसंस्कृतीचा जवळुन अभ्यास रॅमसे व रती हे ब्रिटिश दाम्पत्य करत आहे. 

ब्रिटिश पाहुण्यांनी शेतात घेतला रानमेव्याचा आनंदइंग्लंड येथील रॅमसे व रती नावाचे दाम्पत्य १३ ऑगस्टला जानेफळ येथे आले असता त्यांनी योगेश मिटकरी यांच्या शेत-शिवाराची पाहणी केली. तसेच शेतातील पिकांविषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर या ब्रिटिश पाहुण्यांनी शेतातील पेरू, सिताफळ या रानमेव्याचाही आनंद घेतला.

ब्रिटिशकालीन जिल्हा जानेफळचे आजही महत्वब्रिटिश काळात बुलडाणा ऐवजी जानेफळ हे जिल्ह्याचे ठिकाण होते. तेव्हा ब्रिटिश परदेशी पाहुण्यांचे जानेफळ परिसरात वास्तव्याला होते. त्यांनी सप्तऋषींची परिक्रमा केली होती. त्यामुळे ब्रिटिशकालीन जिल्हा असलेल्या जानेफळचे इंग्लंडवरून येणार्‍या पर्यटक पाहुण्यांमध्ये आजही महत्त्व कायम आहे.