शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांमध्ये घेणार कर्जमुक्तीचे ठराव! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:11 IST

बुलडाणा :   शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीविरोधात शेतकरी संघटनेने फुंकले रणशिंग पत्रके वाटून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :   शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी तुटपुंजी असून, या कर्जमाफीचा कुठलाच फायदा शेतकर्‍यांना होणार नाही.  त्यामुळे शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, विविध टप्प्यांमध्ये पुढील काळात आंदोलने केली जाणार आहेत.   त्याचाच एक भाग म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेतले जाणार आहेत. त्यानंतर सदर ठराव हे शेतकरी संघटनेतर्फे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यात येणार आहेत.  म्हणून शेतकर्‍यांनी घेतलेले कर्ज हे अनैतिक असून, सरकारकडेच शेतकर्‍यांचे कर्ज आहे.  म्हणून सरसकट कर्जमुक्ती व वीज बिल मुक्ती असे दोन प्रमुख विषयांचे ठराव स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभांमध्ये घेण्यात यावे. या ठरावांची प्रत संबंधित गावाच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व जिल्हा कार्यलयांकडे पाठवावी, असेही आवाहन शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 

पत्रके वाटून जनजागृतीजिल्ह्यात ८७0 ग्रामपंचायती असून, शासनाच्या आदेशान्वये १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करून विविध विकासात्मक ठराव घेण्यात येणार आहेत. यावेळी विविध ठरावाला मंजुरात देताना कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घ्यावेत, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे. याबाबत आवाहन करणारे पत्रक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावागावांत जाऊन वाटत असून, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करीत आहेत.

शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटना विविध आंदोलने करणार आहे. त्याचा एक भाग म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वजी बिल मुक्तीचे ठराव घेण्यात यावे आणि जनता ही शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे, हे दाखवून द्यावे.-नामदेवराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य.