शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा बंद, शौचालयाचे प्रस्ताव रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 11:33 IST

Gram Sabha closed, toilet proposal stalled: ग्रामसभाच झाल्या नसल्याने शौचालयाचे प्रस्ताव रखडले आहेत.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेणे बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक विकासकामांना ब्रेक लागला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन शासनाकडे पाठवावे लागतात. मात्र, ग्रामसभाच झाल्या नसल्याने शौचालयाचे प्रस्ताव रखडले आहेत.जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर कलम १४४ लागू करण्यात आली. तसेच ग्रामसभा घेण्यासही बंदी घालण्यात आली. ग्रामसभेत संपूर्ण गावातील नागरिक एकत्र येतात. यामुळे कोरानाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली नाही. फेबु्रवारी महिन्यापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात आली नाही. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपचायतींना ग्रामसभेत ठराव घेऊन गरजवंत लाभार्थ्यांची नावाची यादी पंचायत समितीला पाठवावी लागते. या अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी, अनूसूचित जाती, अनूसूचित जमाती, दारिद्य्र रेषेखालील व्यक्ती, अपंग, विधवा, परितक्त्या या लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ देण्यात येतो.  ग्रामपंचायतला ग्रामसभेत ठराव घेवून गावातील लाभार्थ्यांची यादी शासनाला पाठवावी लागते. त्यानंतर यादी मंजूर होवून पंचायत समितीकडे येते. त्यानंतर शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले की नाही हे पंचायत समितीतील शाखा अभियंता पाहणी करतो, त्याचे छायाचित्र पाठविल्यानंतर अनुदान मिळते. शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तसेच शौचालयाचा वापर सुरू झाल्यानंतर अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येते. शौचालयासाठी १२ हजार रूपये अनुदान देण्यात येते.  मात्र, जिल्ह्यात ग्रामसभाच झाल्या नसल्यामुळे  शौचालयाबाबतचा ठराव घेण्यात आला नाही.

गत दोन वर्षातील सर्व प्रस्ताव मंजूरखामगाव तालुक्यात २०१९-२० साली ९२७ प्रस्ताव शासनाकडून मंजूर होऊन आले होते. यापैकी १४ प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर अपात्र करण्यात आले. उर्वरीत लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले. २०२०-२१ साली ३३९ शौचालय मंजूर झाले होते. सर्वाना अनुदान मिळाले.

 

जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. ग्रामसभा घेतल्यावर गर्दी होते. मोठ्या ग्रामपचायतीत तर चार ते पाच हजार लोक एका ठिकाणी येवू शकतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामसभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे.- चंदनसिंग राजपूतगटविकास अधिकारी, पंचायत समिती, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव