शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election : काही तहसीलमध्ये निकाल अंतिम करण्यात उडाला गाेंधळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 11:41 IST

Gram Panchayat Election : बुलडाणा, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, देऊळगावराजा या ठिकाणी यादी दुसऱ्या दिवशीही तयार नसल्याचे चित्र दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची मतांसह यादी प्रसिद्ध करण्यास अनेक तहसीलमध्ये दिरंगाई केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, लगतच्या जिल्ह्यांमध्ये त्याच दिवशी यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. तर बुलडाणा, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, देऊळगावराजा या ठिकाणी यादी दुसऱ्या दिवशीही तयार नसल्याचे चित्र दिसून आले.जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम पार पडला. त्यासाठीची मतमोजणी सोमवारी सर्वच तहसीलमध्ये झाली. विजयी उमेदवारांच्या नावाची तेथे घोषणा करण्यात आली. तर त्यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर दिले जाणार आहे. त्यासाठी २१ जानेवारी ही मुदत ठरवून देण्यात आली. या मुदतीत निवडणूक आयोगाकडे निवडणुकीनंतर विविध नमुन्यात माहिती द्यावी लागते. त्यावर आयोगाकडून शिक्कामोर्तब केले जाते. विजयी उमेदवारांच्या नावाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्याची सदस्यांना प्रतीक्षा आहे. तर त्याचवेळी आयोगाकडे अहवाल सादर करण्यात काही तहसीलमध्ये कमालीची दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे विजयी झालेल्या उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते, ही माहिती अद्यापही तहसीलदारांकडून मिळालेली नाहीत. या प्रकाराने विविध तहसीलमध्ये सुरू असलेला गोंधळ उघड होत आहे. त्यामध्ये जिल्हा मुख्यालय असलेले बुलडाणा, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, देऊळगावराजा या तहसील कार्यालयाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाला विविध नमुन्यांमध्ये माहिती सादर करावी लागते. ती न दिल्याने जिल्हा स्तरावरूनही ती प्रसिद्धीसाठी प्राप्त झालेली नाही. १९ जानेवारी राेजी रात्री पर्यंत काहीच तालुक्याचे अहवाल जिल्हा प्रशासनास सादर झाले हाेते.

संग्रामपूर:ऑनलाईन माहितीत गोंधळविशेष म्हणजे, आयोगाच्या वेबसाईटवर काही नमुन्यात माहिती ऑनलाईन भरावी लागते. ती भरताना संग्रामपूर तहसील कार्यालयाचा गोंधळ उडाला. त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाशी संपर्क साधणे सुरू होते. 

ग्रामपंचायतीमध्ये सर्वच उमेदवारांसह विजयी उमेदवारांची माहिती अंतिम करण्यास वेळ लागतो. त्यानुसार निवडणूक आयोगाने या सर्व कामांसाठी मुदत वाढवून दिली आहे. २९ जानेवारीपर्यंत ती आहे. त्यानुसार यंत्रणा काम करीत आहे. - दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक