शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election : जातवैधतेसाठी इच्छुक उमेदवारांची कसरत! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 11:56 IST

Gram Panchayat Election : हमीपत्रासाठी मुद्राकांचा तुटवडा, तर तहसीलदारांच्या संदर्भपत्रासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर लढणाऱ्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र द्यावे लागत आहे. त्यासाठी उमेदवारांची सर्वत्र कसरत सुरू झाली आहे. हमीपत्रासाठी मुद्राकांचा तुटवडा, तर तहसीलदारांच्या संदर्भपत्रासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यानुसार आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमीपत्र द्यावे लागत आहे. तसेच जिल्हा जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती लागणार आहे. ही प्रक्रिया ऐन निवडणुक कालावधीत सुरू झाल्याने महिला उमेदवारांसाठी कमालीचा त्रास वाढला आहे. इच्छुक उमेदवारांची जात वैधता प्रमाणपत्रांसाठी दमछाक हाते असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. 

वेबसाइट हँग जातवैधतेसाठी ऑनलाइन अर्ज बार्टीच्या नावे करावा लागतो. त्यासाठी वेबसाइटचा वापर केला जातो. मात्र, राज्यात एकाचवेळी अर्ज सादर करणे सुरू असल्याने ती वेबसाइट हँग होत असल्याचा प्रकारही घडत आहे.   त्यातच नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या कालावधीत तीन दिवस सुटी असल्याने उमेदवारांनी त्याचाही धसका घेतला आहे.अनेक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. 

 मुद्रांकाचा तुटवडा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून १०० रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा आहे. त्याकडे वकिलांच्या संघटनेने सातत्याने लक्ष वेधले. त्यावर तोडगा निघाला नाही.   आता निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना विविध शपथपत्रे द्यावी लागतात. त्यासाठी मुद्रांकांचा  तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातून उमेदवारांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रकारही सुरू झाला आहे. त्यामुळे, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक