शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीकडे शासनाची पाठ!

By admin | Updated: January 14, 2017 00:31 IST

तेरा दिवस उलटूनही तूर खरेदीला प्रारंभ नाही.

किशोर मापारीलोणार, दि. १३- जिल्हय़ात चार ठिकाणी नाफेडच्यावतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या तूर बाजारात विक्रीसाठी येत असली, तरी अद्याप शासनाच्यावतीने तूर खरेदीला प्रारंभ करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून लूट होत आहे. वर्‍हाडात तूर विक्रीस सुरुवात झाली असून, मोठय़ा प्रमाणात शेतकरी बाजारात तूर विक्रीला आणत आहेत. लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभाव योजनेंतर्गत तूर खरेदीचा शुभारंभ ३0 डिसेंबर रोजी संचालक, आडते, व्यापारी, हमाल व शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला; मात्र १३ दिवसांनंतरही तूर खरेदी करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. शासकीय हमीभाव योजनेंतर्गत दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.द्वारा तूर या शेतमालाची शासकीय भावाप्रमाणे खरेदी सुरू झाली असून, शासनाने ठरवून दिलेल्या एफ.ए.क्यू. दर्जाच्या निकषानुसार मारुती व निर्मल जातीच्या तुरीची खरेदी करण्यात येईल, असे नाफेडच्यावतीने ठरविण्यात आले आहे; परंतु १३ दिवसांनंतरही तूर खरेदी करण्यात आलेली नाही. बाजार समितीमध्ये तूर घेऊन आल्यानंतर तूर खरेदी केंद्र कुठेही दिसत नसल्याने शेतकर्‍यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांना कमी भावात तूर विकावी लागत आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असून, जाणीवपूर्वक पिळवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.व्यापार्‍यांचा दुहेरी फायदाशेतकर्‍यांकडून व्यापारी कमी भावात तूर खरेदी करतात व हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर विक्री करतात. त्यामुळे व्यापार्‍यांचाच दुहेरी फायदा होतो. शेतकरी हितासाठी सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्राचा लाभ व्यापारीच घेतील आणि शेतकरी बांधवांची उपासमार होईल. शेतकरी हितासाठी शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी केली आहे.