शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधा त आंदोलन उभारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.

ठळक मुद्देवस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा  इशारा सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे आंदोलन  उभारणार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची  बैठक पुण्यात ३0 ऑगस्ट रोजी झाल्यानंतर केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  ४ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे दिला. त्यानंतर शासनाचा  बंगला, गाडी सोडल्यानंतर ते मुंबईहून एसटीने  बुलडाणा येथे दाखल झाले. यावेळी स्वाभिमानीच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत  केले. याबाबत स्वाभिमानीची पुढील भूमिका स्पष्ट  करण्यासाठी येथील विश्राम भवनात ६ सप्टेंबर रोजी  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  स्वाभिमानीची बबनराव चेके, गजानन बंगाळे,  कौलास फाटे,  राणा चंद्रशेखर चंदन, जनार्धन  शिवणेकर, भगवान मोर,  गिरधर देशमुख,  डॉ.विनायक वाघ, गजानन उबरहंडे आदी  स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  रविकांत तुपकर पुढे म्हणाले की, आपण सत्ता  भोगण्यासाठी सरकारमध्ये गेलो नव्हतो, शेतकर्‍यांचे  भले व्हावे, त्यांना न्याय मिळावा, अशी आपली  भूमिका होती; मात्र भाजपा सरकारने निराशा केली.  त्यामुळे  केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा  देऊन स्वाभिमानी अधिकृतरीत्या एडीएमधून बाहेर  पडली आहे. आमचा कोणाला व्यक्तिगत विरोध  नसून, शेतकर्‍यांविषयी राबविण्यात येणार्‍या  धोरणाबाबत लढाई आहे, असेही तुपकर म्हणाले.