शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध- फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:11 IST

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहिजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

ठळक मुद्दे भारतीय स्वातंत्र्याचा ७0 वा वर्धापन दिन थाटात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहिजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.भारतीय स्वातंत्र्याचा ७0 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्ष श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती श्‍वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा आदींची उपस्थिती होती.    छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अमलात आणून शासन शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, या योजनेनुसार दीड लाख रुपयांपयर्ंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. या योजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झाला आहे. तसेच दीड लाखावर कर्ज असलेल्या ४ हजार ९८0 शेतकर्‍यांना ११८.६१ कोटी रुपयांची कर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत  जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रांवर ४९ हजार ८११ शेतकर्‍यांची एकूण ८.८९ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.  या खरेदीपोटी शेतकर्‍यांच्या खात्यात ४२८.३८ लाख रुपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले आहेत.  जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हाभरात  सन २0१६-१७ साठी दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांची निवड करण्यात आली. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळ्यासाठी पात्र ठरलेल्या सहा हजार ८३६ अर्जांपैकी ३ हजार ९८२ शेततळ्यांना कायार्रंभ आदेश दिले आहे. त्यापैकी २0९८ शेततळी पूर्ण झालेली आहेत, तसेच जिल्ह्यात जलपूर्ती धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत ९ हजार २१ विहिरी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ९२४ विहिरी पूर्ण झालेल्या आहेत. तसेच सन २0१६-१७ मध्ये खरीप हंगामात ३.८७ लाख शेतकर्‍यांनी ३.२६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे.  कृषि व संलग्न क्षेत्राला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या ४९ गावांजवळून जात आहे. या महामार्गावर जिल्ह्यात दोन ठिकाणी स्मार्ट शहरांची निर्मिती केल्या जाणार आहे. महामार्गामुळे जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा, लोणार व दे. राजा तालुक्यांसोबतच संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे. संचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाजभूषण पुरस्कारप्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची उपस्थिती होती.