शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शासन शेतक-यांच्या पाठीशी - जिल्हाधिकारी

By admin | Updated: January 28, 2016 00:58 IST

बुलडाणा येथे प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिन सोहळा थाटात.

बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे, हवामान बदलामुळे संकटे येत आहेत. नापिकी व दुष्काळाच्या काळात संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असणार आहे. हवामान बदलामुळे उद्भवणार्‍या शेतीसमोरील संकटांच्या काळात शेतकर्‍यांनी धीर सोडू नये. धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जि.प अध्यक्ष अलका खंडारे, माजी आमदार विजयराज शिंदे, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सभापती आशा झोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. दुष्काळाच्या संकटातून शेतकर्‍यांना सावरण्यासाठी आर्थिक मदतीचे वाटप सुरू असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाने १८३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्याला दिला आहे. यानंतरही शासन १४५ कोटी रूपयांचा दुसरा हप्ता देणार आहे. या मदतीचे वाटप थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात करण्यात येत आहे, तर पीक विमा योजनेच्या माध्यमातून ९१ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या ३३0 गावांमध्ये ५ हजार ७९४ कामे जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे; तसेच २४६ कामे प्रगतीपथावर आहेत. १६६0 लाभार्थ्यांना सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.