शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडिदाची आवक घटली!

By admin | Updated: September 28, 2016 01:50 IST

भावात वाढ; मात्र भाववाढीचा फायदा शेतक-यांऐवजी व्यापा-यांनाच होणार.

बुलडाणा, दि. २७- गत तीन दिवसांत जिल्ह्यात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मूग व उडिदाच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. परिणामी, बाजारात उडिदाची मागणी वाढली असून, भाव आठ हजारांपेक्षा जास्त मिळत आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच मुबलक पाऊस असल्यामुळे जिल्ह्यात मुगाची २५ हजार ६१७ हेक्टरवर तर उडिदाची २६ हजार ८१६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. मुबलक पावसामुळे मूग व उडिदाचे पीक जोमात होते. गत आठ दिवसांपासून शेतकरी सदर पिकाची काढणी करीत आहे. मूग व उडिदाची काढणी करून अनेक शेतकर्‍यांनी शेतात ढीग लावले आहेत. शेतकरी यावर्षी चांगले उत्पादन होईल, या अपेक्षेत असतानाच २५ ते २६ सप्टेंबरच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांनी शेतात ढीग लावून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले, तसेच शेतात सध्या काढणीला आलेल्या झाडांच्या शेंगाही जोरदार पावसाने गळून पडल्या, त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. मूग व उडिदाच्या पिकाचे नुकसान झाल्याचा परिणाम बाजारावर पडला आहे. या पिकांची बाजार समितीत आवक घटली आहे, तसेच भावातही वाढ झाली आहे. मुगाला शासनाने ५२00 रुपये हमीभाव दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुगाला चार हजार रुपये प्रती क्विंटल भाव होते. यादरम्यान व्यापार्‍यांनी या दरात मुगाची खरेदी करून शेतकर्‍याची प्रचंड लूट केली. त्यानंतर शासनाने हमीभाव केंद्र सुरू करून हमीभावात मुगाची खरेदी करणे सुरू केले. गत आठ दिवसांपासून मुगाच्या भावातही वाढ झाली आहे. उडिदाच्या भावातही अचानक वाढ झाली असून, सध्या बाजारात उडिदाला सात हजार रुपये, आठ हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. या पिकांच्या भावात वाढ झाली असली, तरी त्याचा फायदा होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अत्यल्प आहे. भाववाढीचा फायदा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांनाच मूग व उडिदाच्या पिकात गत एक महिन्यात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. शेतकर्‍यांना पैशाची गरज असल्यामुळे पीक येताच शेतकरी विक्री करतात. व्यापारी या मालाची खरेदी करून साठवणूक करतात. भाववाढ झाल्यानंतर शेतमालाची विक्री करतात. त्यामुळे सध्या मूग व उडिदाच्या होत असलेल्या भाववाढीचा फायदा शे तकर्‍यांना कमी तर व्यापार्‍यांनाच जास्त होत आहे. जोरदार पावसामुळे सोयाबीनचेही नुकसान जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकाचे जोरदार नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा झडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत तीन दिवसांपासून मूग व उडिदाच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक घटली असून, याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. या पिकांचे भाव वाढले असले, तरी त्याचा फायदा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांनाच अधिक होणार आहे.- गजानन अमदाबादकर शेतकरी संघटना, बुलडाणा.