शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्ड मिळाले पण, लाभ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:44 IST

तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत रेशनकार्ड आॅनलाईन मंजुरीचे काम रेंगाळत पडले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मागीलवर्षी पासून स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने रेशनकार्ड आॅनलाईन केले आहे. धान्याचे वितरणसुध्दा थंब पध्दतीने होत असल्याने बऱ्यापैकी गैरप्रकाराला आळा बसला आहे. मात्र शासनाने आॅनलाईन योजना अंमलात आणली असली तरी, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत रेशनकार्ड आॅनलाईन मंजुरीचे काम रेंगाळत पडले आहे. त्यामुळे अनेकांना रेशनकार्ड मिळण्यास अडचण जात आहे.नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड कडे पाहिले जाते. शिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना रेशनकार्ड आवश्यक झाले आहे. अनेक ठिकाणी शैक्षणिक फी सवलतीमध्ये सुद्धा रेशनकार्डची आवश्यकता आहे. मागील दीड वर्षापासून सर्व रेशनकार्ड आॅ़नलाईन झाले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात तहसिलदारांच्या देखरेखीखाली प्रत्येक तहसिल कार्यालयात रेशन कार्ड वितरीत करण्याचे काम चालते.पुरवठा निरिक्षकांना रेशन कार्ड आॅनलाईन झाल्यानंतर तत्काळ मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र पुरवठा निरिक्षक आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने नागरिकांच्या हाती रेशन कार्ड मिळूनही उपयोग होतांना दिसत नाही. जोपर्यंत रेशनकार्ड आॅनलाईन होत नाही तोपर्यंत स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य त्यांना मिळू शकत नाही. याप्रकाराबाबत नागरिकांकडून ओरड होत असतानाही दुर्लक्ष केल्या जात आहे. यामुळे जनतेमध्ये प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे.

आॅनलाईन प्रणालीवर प्रश्नचिन्ह!वास्तविक रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर सहा महिन्याच्या आत मिळाले पाहिजे असा नियम आहे. मात्र त्याचे पालन पुरवठा विभागामार्फत होत नसल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकामध्ये तिव्र रोष निर्माण झाला आहे. यामध्ये पांढरे, केशरी व पिवळे रेशन कार्डचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही तहसिलकार्यालयामध्ये दलालामार्फत गेले तर हेच काम महिन्याभरात होत असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे आॅनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या रेशनकार्ड वितरण प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा प्रशासन कोणत्याही अधिकाºयाकडून किंवा तहसिल कार्यालयातील कर्मचाºयाकडून हयगय सहन करणार नाही. पुरवठा विभागातील कर्मचाºयांनी चोख जबाबदारी पार पाडली पाहिजेच. यासंदर्भात निश्चितच सर्व तहसिलदारांशी बोलून सुचना देण्यात येतील.- प्रमोदसिंह दुबे,अतिरिक्त जिल्हाधिकारी,बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव