शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गुड मॉर्निंग पथकाची पुन्हा फेररचना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:46 IST

खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत खामगाव शहराची राज्यस्तरीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय तपासणी पथकाकडून शहराची तपासणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी म्हणून, पालिकेने नवीन पथकांचे गठन केले आहे.

ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियान एका पथकात चार जणांचा समावेश

खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत खामगाव शहराची राज्यस्तरीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय तपासणी पथकाकडून शहराची तपासणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी म्हणून, पालिकेने नवीन पथकांचे गठन केले आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहर म्हणून खामगाव शहराने जिल्हा स्तरावर सोबतच राज्यस्तरावर आपला सहभाग नोंदविला आहे. त्या अनुषंगाने  जिल्हा आणि राज्य  पातळीवरून खामगाव शहराची तपासणीही करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा आणि राज्यस्तरीय तपासणी पथकाचे सुचविलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी, तसेच संपूर्ण शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी आता नव्याने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या देखरेख पथकाची पुन्हा फेररचना करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी १२ जून रोजी नव्याने गुड मॉर्निंग पथकाची रचना करण्यात आली होती. दरम्यान, आता सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा फेररचना करण्यात आलेल्या पथकांकडे संपूर्ण परिसराची सरसकट जबाबदारी न देता, विशिष्ट परिसराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये पथक प्रमुखांसह चार सहायकांची नियुक्ती करण्यात आली असून, या पथकामध्ये पालिकेतील ६५ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे आता गुडमॉर्निंग पथकाकडून प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संकेत आहेत. 

सकाळ-संध्याकाळ देणार भेटी!खामगाव नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी फेररचना करण्यात आलेल्या पथकामध्ये ५६ जणांचा समावेश आहे. यामध्ये  आरोग्य विभागासोबतच इतरही विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. एका पथकामध्ये चौघांचा समावेश राहणार असून, चौघा जणांचे पथक सकाळी तर दुसर्‍या चौघा जणांचे पथक सायंकाळी शहराच्या विविध भागात भेटी देणार आहेत.