शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णपदक विजेत्या हर्षदाचा औरंगाबादेत सत्कार

By admin | Updated: September 26, 2016 02:30 IST

संज्युनियर विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणा-या हर्षदाचे अंभोरे यांनी स्वीकारले पालकत्व.

अशरफ पटेलदेऊळगावराजा (जि. बुलडाणा), दि. २५- अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या हर्षदा निठवेचा औरंगाबाद येथे स्थानिक आदिशक्ती ग्रुप, संतोषभाऊ मित्रमंडळ व मातृतीर्थ पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी संतोष अंभोरे यांनी तिचे ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पालकत्व स्वीकारून आर्थिक मदत दिली. हर्षदाने सुवणपदक पटकाविल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत उपरोक्त संघटनांनी तिचा पुढील आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यात सत्कार आयोजित केला आहे. देऊळगावमही येथील अत्यंत गरीब निठवे कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देताना चमकदार कामगिरीची नोंद केली होती. याबाबत २४ सप्टेंबर रोजी ह्यमॉ जिजाऊच्या लेकीची सुवर्ण भरारीह्ण असे ह्यलोकमतह्णमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तिच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. सन २0२0 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेचे लक्ष्य हर्षदाने ठेवले असून, त्यासाठी तिला मदतीची आवश्यकता आहे. हर्षदा सध्या शुटिंग रेंजचा सराव एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम आणि संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. येणार्‍या काळात २५ मीटर शुटिंग रेंजमध्ये चार लाखांपेक्षा जास्त खर्च येत असल्याने तिला मदतीची गरज आहे. हरियाणा आणि दिल्ली या दोन्ही राज्यांतून तिला सर्व सुविधा देऊन त्यांच्या संघाकडून खेळण्याचे निमंत्रण देण्यात आले; मात्र तिने नकार देत केवळ महाराष्ट्रासाठीच खेळणार असल्याचा निश्‍चय केला आहे.