शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील मोहना ग्रामपंचायतची ग्रामसभा अव्वल !

By admin | Updated: May 5, 2016 02:59 IST

आदर्श ग्रामसभा पुरस्कार; राज्यातील ३३ ग्रामपंचायतींचा गौरव.

बुलडाणा: स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनातर्फे आदर्श ग्रामसभा स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेचा निकाल ३ मे रोजी घोषित करण्यात आला असून, मेहकर तालुक्यातील मोहना ही ग्रामपंचायत यात अव्वल ठरली आहे. राज्यातील ३३ ग्रामसभांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्व.यशंतवराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात सन २0१२ -१३ या वर्षात ग्रामसभांची स्पर्धा सुरू करण्यात आलीे. या माध्यमातून पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणाचा शासनाचा प्रयत्न आहे. यामध्ये ग्रामसभेने घेतलेले विषय, आयोजनाचे औचित्य, ग्रामस्थांची उपस्थिती, ग्रामसभेत झालेली चर्चा या आधारावर मूल्यमापन केले जाते. जिल्हा परिषदांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव सादर झाल्यावर आदर्श ग्रामसभेची निवड केली जाते. या स्पध्रेत राज्यातील ३३ ग्रामसभांना गौरविण्यात आले असून, मोहना ग्रामपंचायतीची ग्रामसभा अव्वल ठरली आहे. मोहनासह ३३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाखाचा पुरस्कार दिला जाणार आहे.