शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गो-हा ठार

By admin | Updated: January 16, 2017 02:02 IST

भीतीचे वातावरण; वन विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला.

मोताळा, दि. १५- तालुक्यातील रोहिणखेड शिवारात शनिवारी रात्री शेतकर्‍याच्या शेतातील गोठय़ावर बिबट्याने हल्ला करून एक वर्ष वयाच्या गोर्‍हय़ाला ठार मारले. या हल्ल्यात शेतकर्‍याचे नुकसान झाले असून, परिसरात बिबट्या अवतरल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.दयाराम ङ्म्रीराम राजनकर यांनी रोहिणखेड शिवारातील नळगंगा नदीच्या काठावर जनावरांचा गोठा बांधलेला आहे. या गोठय़ात शनिवारी रात्री काही जनावरे बाहेर, तर काही आत बांधलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठय़ाचा झपाटा तोडत आत प्रवेश करून गोर्‍हा फस्त केला. १५ जानेवारी रोजी सकाळी दयाराम राजनकर चारा-पाणी करण्यासाठी गोठय़ावर गेले असता हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून गोर्‍हय़ाला ठार मारल्याचे दिसून आले. राजनकर यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनपाल के. डी. सरनाईक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला. यावेळी वन विभागाला बिबट्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडल्याचे निष्पन्न झाले. परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून, मागील १८ दिवसांपूर्वी (२८ डिसेंबर) येथील समाधान पोफळे यांच्या गोठय़ावर बिबट्य़ाने रात्री हल्ला करून एक गोर्‍हा व तीन कुत्र्यांचा फडशा पाडला होता. यावेळी एक गाय गंभीर जखमी होऊन बिबट्य़ाच्या तावडीतून वाचली होती. १४ जानेवारीच्या रात्री पुन्हा बिबट्याने एका गोर्‍हय़ाचे लचके तोडून ठार मारल्याने शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरातील शेतकर्‍यांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांनी समूहाने जावे व जातेवेळी हातात काठी, टॉर्चसोबत ठेवून हिंस्त्र प्राण्यांना पळविण्यासाठी शेत शिवारात फटाके फोडावे, अशी मागणी होत आहे.