शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

बुलडाणा जिल्ह्यात आता ‘गो-गर्ल-गो’ मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:03 IST

‘गो-गर्ल-गो’ या मोहिमेंतर्गत राज्यात ६ ते १८ वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशामध्ये फीट इंडिया मुव्हमेंट हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ‘गो-गर्ल-गो’ या मोहिमेंतर्गत राज्यात ६ ते १८ वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर ही स्पर्धा झाल्यानंतर राज्यस्तरावर आयोजन करण्यात येणार आहे.२९ आॅगस्ट २०१९ या राष्ट्रीय क्रीडा दिनी फीट इंडिया मुव्हमेंट या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते इंदीरा गांधी स्टेडीयम, नवी दिल्ली येथुन करण्यात आलेला आहे. याप्रसंगी सर्वांनी शारीरिक तंदुरुस्तीबाबत शपथ दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींचे तंदुरुस्तीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता मुलगी शिकली की तिला योग्य दिशा मिळते. जेव्हा ती मोठी होते, तेव्हा ती संपूर्ण कुटूंबावर प्रभाव टाकते. त्याअनुषंगाने गो-गर्ल-गो या योजनेअंतर्गत राज्यात ६ ते १८ वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलया आहेत. ही स्पर्धा सहा ते नऊ वर्षापर्यंत मुली, १० ते १३ वर्षापर्यंत मुली व १४ ते १८ वर्षापर्यंत मुली या तीन गटात आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये फक्त १०० मीटर धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन शाळास्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरापर्यंत करण्यात येत आहे. राज्यस्तर स्पर्धा ८ मार्च २०२० रोजी जागतीक महिला दिनानिमित्त शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील वैशिष्ट्यपुर्ण प्राविण्य प्राप्त करणाऱ्या मुलींना त्यांचे उज्वल क्रीडा भविष्यास अनुसरुन प्रायोजक तत्वाद्वारा प्रशिक्षणाकरीता संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या स्पर्धेत शाळास्तरापासुन प्रत्येक वयोगटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मुली पुढील स्तरावरच्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. स्पर्धांसाठी १५ फेब्रुवारीची मुदतबुलडाणा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी ६ ते १८ वयोगटानुसार शाळास्तरावर मुलींच्या १०० मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत करणे आवश्यक आहे. वयोगटनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाºया मुलींना तालुकास्तरावरील स्पर्धेकरीता प्राविण्य प्राप्त खेळाडूंच्या यादीसह सहभागी करुन घ्यावे, अशा सुचना क्रीडा विभागाने दिल्या आहेत. तालुकास्तरील स्पर्धा २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत आयोजित होत असल्याने, तालुकास्तरीय स्पर्धेच्या तारखेकरीता आपले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अथवा तालुका क्रीडा संयोजक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा