शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीमुक्तीसाठी उत्कृष्ट कार्य करणार्‍यांचा गौरव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:14 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व स्तरातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्था आदी या कामासाठी सरसावले आहेत.

ठळक मुद्देहगणदरीमुक्त शेगावमलकापूरच्या सभापती, ‘बीडीओं’चा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व स्तरातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्था आदी या कामासाठी सरसावले आहेत. त्यांच्या या कामाचा सन्मान करून शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हगणदरीमुक्त गट असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, हगणदरीमुक्त तालुके मलकापूर आणि शेगाव यांचे सभापती आणि गटविकास अधिकारी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचे काम वेगात सुरू आहे. या वर्षात सध्यापर्यंत तीस हजारांपर्यंत शौचालय बांधकाम पुर्ण झालेले आहे. यासाठी सर्व स्तरावरील पदाधिकारी,  अधिकारी, कर्मचारी, काही सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांचेच सहकार्य लाभत आहे. त्याचीच फलश्रुती म्हणजे जिल्ह्यात मलकापूर आणि शेगाव ही दोन तालुके हगणदरीमुक्त झाली. जिल्ह्यातील एकूण ३४३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त तर एकूण अडीच लाख शौचालय बांधकाम पूर्ण झालेले आहेत. यासाठी मलकापूर तालुक्यातील दाताळा गटातील सदस्य तथा जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, नरवेल जिल्हा परिषद गटाच्या सदस्य तथा उपाध्यक्ष मंगला रायपुरे, देवधाबा गटाचे सदस्य केदार एकडे तसेच शेगाव तालुक्यातील आळसणा गटाचे राजाभाऊ भोजने, चिंचोली गटाच्या उषा सावरकर, माटरगाव बु., गटाच्या स्वाती देवचे, मलकापूर पंचायत समिती सभापती संगीता तायडे, गटविकास अधिकारी अशोक तायडे, शेगाव पंचायत समिती सभापती विठ्ठल पाटील, तर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे आदींचा प्रातिनिधिक स्वरूपात मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच ज्यांचे गट हगणदरीमुक्त होणे बाकी आहे, अशांना आवाहन पत्र देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र वितरित करण्यात आले. तसेच जिल्हा लवकरात लवकर हगणदरीमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान