शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेगांवात दोन घोड्यांच्या रक्तजलमध्ये आढळले ग्लॅंडर्संचे जिवाणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:58 IST

बुलडाणा-  जिल्ह्यात शेगाव येथील दोन घोड्यांच्या रक्तजल नमुन्यांमध्ये ग्लॅंडर रोगासाठी पॉझीटीव्ह असणारे जिवाणू आढळून आली आहेत. हरीयाणामधील हिस्सार येथे असलेल्या नॅशनल ईक्वॉइन रिसर्च सेंटर, (राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था)  यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाकडून 26 नमुने  जिल्ह्यातील घोड्यांचे पाठविण्यात आले होते. त्यापेकी दोन नमुने पॉझीटीव्ह आढळले आहेत.

ठळक मुद्देअश्ववर्गीय जनावरांमध्ये आढळतो ग्लँडर्सजिल्ह्यात अश्ववर्गीय प्राण्यांची वाहतूक करण्यास प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा-  जिल्ह्यात शेगाव येथील दोन घोड्यांच्या रक्तजल नमुन्यांमध्ये ग्लॅंडर रोगासाठी पॉझीटीव्ह असणारे जिवाणू आढळून आली आहेत. हरीयाणामधील हिस्सार येथे असलेल्या नॅशनल ईक्वॉइन रिसर्च सेंटर, (राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था)  यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाकडून 26 नमुने  जिल्ह्यातील घोड्यांचे पाठविण्यात आले होते. त्यापेकी दोन नमुने पॉझीटीव्ह आढळले आहेत. ग्लॅंडर हा रोग अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये असतो. या रोगाचा प्रादुर्भाव घोड्यांमधून मनुष्यामध्ये होतो. हा रोग 2009 च्या प्रीव्हेंशन अँण्ड कन्ट्रोल ऑफ इन्फेक्शन अँण्ड कॉन्टॅजीयस डिसीजेस इन ॲनीमल या कायद्यातंर्गत अधिसूचीत करण्यात आलेला आहे. मानवास प्राणघातक रोग असल्यामुळे गंभीरता लक्षात घेता  रोग फैलावणार नाही, या दृष्टीकोनातून व सदर कायद्याच्या कलम 7 अन्वये जिल्ह्यातील अश्ववर्गीय जनावरांची वाहतुक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.जिल्ह्यात  अश्ववर्गीय जनावरांची वाहतूक करणे व जिल्ह्याबाहेरील अश्ववर्गीय प्राणी जसे घोडा, खेचरे व गाढव प्राणी जिल्ह्यात येणार नाहीत, याबाबत मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात संपूर्णपणे अश्ववर्गीय जनावरांच्या होणाऱ्या वाहतूकीस जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले आहे. जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांमधून येणाऱ्या व जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात होणाऱ्या अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीससुद्धा निर्बंध घालण्यात येत आहे.  सदर आदेश 31 डिसेंबर 2017 पर्यंत लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.