शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना २0 लाख रुपये भरपाई द्या

By admin | Updated: September 7, 2014 00:33 IST

वैद्यकीय प्रवेश नाकारल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश.

बुलडाणा : वैद्यकीय प्रवेश परीक्षेत पात्र ठरल्यानंतरही गुणवत्ता डावलून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्यामुळे येथील स्नेहल देशपांडे व नकुल सोनुने या विद्यार्थ्यांना नुकसानभरपाईपोटी २0 लाख रुपये राज्य सरकारने द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. येथील पॅथॉलॉजिस्ट मिलिंद देशपांडे यांची कन्या स्नेहल देशपांडे व नकुल सोनुने यांनी सन २0१२ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये ते पात्र ठरल्यामुळे नियमानुसार त्यांना एमबीबीएससाठी प्रवेश देणे अनिवार्य होते; मात्र या विद्यार्थ्यांची गुणवत्ता डावलून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाने त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी प्रवेश नियंत्रण समितीकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत समितीने पुणे, औरंगाबाद आणि नागरपूर येथी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांच्यामार्फत चौकशी केली असता खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी २६0 वैद्यकीय प्रवेशामध्ये अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर समितीने हे बेकायदेशीर २६0 प्रवेश रद्द करावेत अशी शिफारस राज्य सरकारकडे केली होती. तथापि, राज्य सरकारने या समितीच्या शिफारशीची दखलही घेतली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तब्बल दोन वर्ष हे प्रकरण न्यायालयात चालले. आता २ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चल्लमेश्‍वर व न्या. ए.के. सिकरी यांच्या खंडपीठाने निकाल दिला. या निकालात म्हटले आहे की, प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी २0 लाख रुपये द्यावे, तर संबंधित दोषी अधिकार्‍यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.